नाशिकरोड : जेलरोड येथील होली फ्लॉवर इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून परिसरातून स्वच्छता जनजागृती रॅली काढली होती.होली फ्लॉवर इंग्लिश हायस्कूल येथून स्वच्छता जनजागृती रॅलीचे उद्घाटन मुख्याध्यापक सुपर्णा देब, श्रीती तालुकदार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रॅली श्रीरामनगर, जुना सायखेडारोड, जेलरोड, गोदावरी दसक घाटापर्यंत काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी चौक, शिवाजी चौक व गोदावरी घाट दसक आदि परिसरात स्वच्छता मोहीम राबवून केरकचरा संकलित केला. यावेळी संचालक सुदीप देब, उपमुख्याध्यापक गीता एस., शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
होली फ्लॉवर स्कूलतर्फे जनजागृती
By admin | Updated: October 5, 2015 23:13 IST