शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात जनजागृती फेरी : विविध कार्यक्रमांचे आयोजन महाअवयवदान महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:51 IST

सटाणा : महाअवयवदान महोत्सव व सप्ताहांतर्गत येथील पंचायत समिती, मराठा इंग्लिश स्कूल आणि जिजामाता गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ३१) शहरातून महाअवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली.येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणातून फेरीला सुरुवात झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंदा सुवर्णकार यांच्या हस्ते फेरीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सुवर्णकार ...

सटाणा : महाअवयवदान महोत्सव व सप्ताहांतर्गत येथील पंचायत समिती, मराठा इंग्लिश स्कूल आणि जिजामाता गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ३१) शहरातून महाअवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली.येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणातून फेरीला सुरुवात झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंदा सुवर्णकार यांच्या हस्ते फेरीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सुवर्णकार यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाºयांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. अवयव प्रत्यारोपण हा आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीचा एक चमत्कार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शरीरातील एखादा अवयव विविध उपचारांनी बरा न होता कायमचा निकामी होऊन एखादा रुग्ण मृत्युपंथाला लागतो. अशावेळी दुसºया कोणा जिवंत वा मेंदुमृत व्यक्तीचा तो अवयव सुदृढ अवस्थेत मिळाला तर त्याचे प्रत्यारोपण करून शस्त्रक्रिया यशस्वी करता येते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. सुवर्णकार यांनी केले. जिजामाता हायस्कूलपासून सुरू झालेली फेरी ताहाराबाद रोड या प्रमुख मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा, यशवंतराव महाराज मंदिर मार्गाने पुढे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आली. येथे फेरीचा समारोप करण्यात आला. यावेळी सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक, कर्मचाºयांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप नरवटे यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत कापडणीस, डॉ. पंकज शिवदे, मोहनकुमार देवरे, अजित भामरे, किरण शेवाळे, पंकज जाधव, राजेंद्र भदाणे, विजय देवरे आदी उपस्थित होते.