नाशिक : ‘पाणी म्हणजे जीवन’ याची सर्वांना जाणीव व्हावी, यासाठी संस्था, संघटनांतर्फे जलदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनीही जनजागृतीसाठी जलदिंडी काढून पाणीबचतीच्या घोषणा दिल्या.नाएसो माध्यमिक विद्यालयनाएसोच्या उंटवाडी माध्यमिक विद्यालयात जागतिक जलदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रत्नप्रभा सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापक कल्याणी अग्निहोत्री होत्या. जलदिंडीचा प्रारंभ जलपूजन व गंगा आरतीने झाला. विद्यार्थ्यांनी पाण्यावर आधारित कविता, घोषवाक्य, भारूड, अभंग यांच्या सादरीकरणातून पाण्याचे महत्त्व व पाणीबचतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. प्रमुख पाहुण्या कल्याणी अग्निहोत्री यांनी पाणी बचतीचे आवाहन केले. सुनंदा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. संतांनी पाण्याचे महत्त्व कशा प्रकारे सांगितले ते विविध वेशभूषेतून विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी पाणीबचत या विषयावर आधारित नाटिका सादर केली. पाणीबचतीचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक रत्नप्रभा सूर्यवंशी यांनी, विद्यार्थ्यांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याबाबत तसेच पाणीबचतीबाबत जलप्रतिज्ञा दिली. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष पा. म. अकोलकर, उपमुख्याध्यापक प्रियंका निकम, पर्यवेक्षक अशोक कोठावदे, सुनंदा कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक डी. डी. पवार, अनुजा देशमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मंगला मुसळे, दीपाली पाटील, गोविंद केतकी, तृप्ती बडगुजर यांनी केले. सूत्रसंचालन शालेय विद्यार्थी साहिल भोसले व गायत्री खैरनार यांनी केले.मराठा हायस्कूलमराठा हायस्कूलमध्ये जागतिक जलसाक्षरता दिनानिमित्त जलसाक्षरता कार्यक्रम मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पाणी वाचविण्याची शपथ घेतली. जलदिनानिमित्त मुख्याध्यापक पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, बचत, काटकसरीचे उपाय पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी व जल हीच संपत्ती असल्याचे पटवून सांगितले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक योगराज चव्हाण यांच्यासह अरुण पवार, विकास आहेर उपस्थित होते. विजय म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.पेठे विद्यालयनाएसो संचलित रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात शालेय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागतिक जलदिन उत्साहात संपन्न झाला. संस्था अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी सुरू केलेल्या जलसाक्षरता अभियानाच्या अंतर्गत ‘पाणी बचत बँक’ या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, पर्यवेक्षक मुक्ता सप्रे, राजश्री मुळे आदि उपस्थित होते. याप्रसंगी वरद जोशी याने पाणी बचतीवरील कविता सादर केली.विजय पाटोळे यांनी पाणी बचतीच्या संदेश देणारे काव्य सादर केले. रूपाली रोटवदकर यांनी एकपात्री नाटिकेतून अभिनयासह पाण्याचे महत्त्व सांगितले. मुक्ता सप्रे यांनी पाणीबचतीसंदर्भातील वास्तवता लक्षात आणून दिली. त्यासंदर्भात उपाययोजना कोणत्या केल्या पाहिजेत याबद्दल माहिती सांगितली. याप्रसंगी उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे यांनी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा दिली. सूत्रसंचालन रूपाली ठाकूर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पाणी बचत करण्याची शपथ घेतली. दुपारच्या सत्रात वर्षा मोराणे, पूनम वाल्हेकर यांनी जलदिनाचे महत्त्व सांगितली. महेंद्र गावित यांनी पाण्याची बचत करणे, काळाची गरज असल्याचे सांगितले.
शहरात जलदिनानिमित्त जनजागृती दिंडी
By admin | Updated: March 23, 2017 21:31 IST