शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

वृक्षलागवडीबाबत जनजागृती

By admin | Updated: June 30, 2016 00:54 IST

कळवण : दोन लाख ७७ हजार रोपांची होणार लागवड

 कळवण : पर्यावरणाचे असंतुलन, वाढते प्रदूषण याला आळा घालण्यासाठी वनसंवर्धन अभियानाअंतर्गत दि. १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात दोन कोटी रोपांच्या लागवडीचा शासनाचा उद्देश आहे. तालुक्यात नगरपंचायतीसह तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांची जय्यत तयारी सुरू असून, कळवण वनपरिक्षेत्रात जनजागृती करून जास्तीत जास्त रोप लागवड करण्यासाठी वनविभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे. तालुक्यात कळवण वनपरिक्षेत्र विभागात एक लाख ५४ हजार ८००, तर कनाशी वनपरिक्षेत्र विभागात एक लाख २१ हजार ५०० वृक्षलागवडीचा संकल्प असून, संपूर्ण तालुक्यात दोन लाख ७७ हजार ३०० रोपांची लागवड करण्याचा निर्धार कळवण वन विभागाने केला आहे. तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत शाळा, आरोग्य केंद्रे व माध्यमिक शाळा, संस्था, ग्रामपंचायत आदिंनी या अभियानात भाग घेतला असून, वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे.कळवण वनपरिक्षेत्रातील एकूण १३ गावांमध्ये ३२५ हेक्टर क्षेत्रावर एकूण एक लाख ५४ हजार ८००, तर कनाशी वनपरिक्षेत्रात एक लाख २१ हजार ५०० विविध जातींच्या रोपांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. याबाबत गावागावांत जाऊन जनजागृती करण्याचे काम जोरात सुरू आहे. गावपातळीवरील ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रे, माध्यमिक विद्यालय, तलाठी, सोसायटी, सहकारी संस्था प्रयत्न करीत आहेत.तालुक्यातील १३ गावांतील १३ रोपवन स्थळांची यासाठी निवड करण्यात आली असून, तेथे खड्डे खोदण्याचे कामे पूर्ण झाले आहे. दि. १ जुलै रोजी कळवण प्रादेशिक वनक्षेत्रात वंजारी व साकोरा प्रत्येकी १३,५००, गोबापूर- ४१००, कुंडाणे-ओतूर- १३५००, दह्याणे-ओतूर- १३५००, भुसणी- १३५००, विसापूर- १३५००, बिजोरे- १३५००, निवाणे- १३५००, साकोरा-जिरवाडे- १३५००, इंशी- ७७०० असे रोपे लागवडीचे नियोजन असून, सकाळी ६ वाजता वृक्षलागवडीस प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. (वार्ताहर)या कार्यक्र मांतर्गत कळवण तालुक्यातील सर्व नागरिक, स्वयंसेवी व अशासकीय संस्था, उद्योजक, सहकारी संस्था, शाळा-महाविद्यालये, लोकप्रतिनिधी इत्यादिंचा सहभाग मिळवण्यासाठी कळवण व कनाशी प्रादेशिक वनविभागातर्फे गावागावांमध्ये जाऊन सर्वांना सहभागी होण्याबाबत आमंत्रित करण्यात येत आहे. तसेच बॅनर लावणे, निमंत्रणपत्रिका देणे, गावागावांत ग्रामस्थांच्या बैठका घेणे, वाहनास स्पिकरद्वारे ध्वनिफीत वाजवून जनजागृती करण्याचे काम जोरात सुरू आहे. नागरिकांनी या कार्यक्र मात सहभागी व्हावे, असे आवाहन कळवणचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, कनाशी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आढे, वन परिमंडल अधिकारी वसंत पाटील, पंकज देवरे यांनी केले आहे.