शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:28 IST

धकाधकीच्या जीवनात गतिमान झालेल्या रस्त्यांवरील मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण बघता वाहतुकीचे नियम व सुरक्षित वाहतूक याविषयी जनजागृती करण्याच्या सामाजिक जाणिवेतून शुक्रवारी (दि.१५) ‘बिइंग जेनेसिस’ सामाजिक संस्थेने नाशिक शहर पोलिसांच्या सहकार्याने शहरातील जेहान सर्क ल सिग्नलवर रहदारीचे नियमांविषयी नागरिकांचे प्रबोधन केले.

ठळक मुद्देपोलिसांचाही सहभाग : पटवून दिले हेल्मेट, सीट बेल्टचे महत्त्व

नाशिक : धकाधकीच्या जीवनात गतिमान झालेल्या रस्त्यांवरील मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण बघता वाहतुकीचे नियम व सुरक्षित वाहतूक याविषयी जनजागृती करण्याच्या सामाजिक जाणिवेतून शुक्रवारी (दि.१५) ‘बिइंग जेनेसिस’ सामाजिक संस्थेने नाशिक शहर पोलिसांच्या सहकार्याने शहरातील जेहान सर्क ल सिग्नलवर रहदारीचे नियमांविषयी नागरिकांचे प्रबोधन केले.‘बिइंग जेनेसिस’ सामाजिक संस्था व नाशिक शहर पोलिसांनी जेहान सर्कल परिसरात हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा वापर, सिग्नलचे पालन आदी बाबींवर नागरिकांचे प्रबोधन केले. या मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला असून, शहरातील अनेक ठिकाणी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी रहदारीच्या नियमांचे उस्फूर्तपणे पालन करणाऱ्या नागरिकांचा चिमुकल्यांकडून गुलाबपुष्प देऊन सन्मान करतानाच ‘रहदारीच्या नियमाची नव्हे सक्ती...ही तर सुरक्षित जीवनाची गुरुकिल्ली’ यासारखे महत्त्वाचे संदेश देत नागरिकांची जनजागृती कतेरण्यात आली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक फुलसिंग भोये, उपनिरीक्षक प्रवीण माळी यांच्यासह बिइंग जेनेसिसचे सोनाली कुलकर्णी, राहुल रायकर, मानसी रायकर, शीतल गायकवाड, कृष्णा पगारे, राहुल दिंडोर्डे, दीपक, एलिटचे शैलेंद्र गायकवाड, सक्षम फाउंडेशनचे रजत शर्मा, राम पवार आदी उपस्थित होते.हा उपक्रम शहरात विविध ठिकाणी सातत्याने चालू ठेवण्याची योजना असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी