शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पुलासाठी तरतूद दीड कोटी आणि खर्च मात्र ३२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:53 IST

गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याच्या प्रस्तावास मार्च महिन्यात झालेल्या अंदाजपत्रकीय सभेतच कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतरही अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

नाशिक : गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याच्या प्रस्तावास मार्च महिन्यात झालेल्या अंदाजपत्रकीय सभेतच कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतरही अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि आता तर ३२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर मंजूर करण्यात आला आहे. नगरसेवकांना अंदाजपत्रकीय तरतुदीइतकाच खर्च करण्यासाठी परवानगी असल्याचे सांगितले जात असताना या पुलासाठीच मात्र प्रशासनाचा नियमाला अपवाद का असा प्रश्न सातपूर प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड यांनी केला आहे.गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यावरून सध्या महापालिकेत रामायण सुरू असून, त्याच अनुषंगाने गायकवाड यांनी आयुक्तांना पत्र देऊन विरोध केला आहे. विशेष म्हणजे गोदावरी नदीवरील एक पूल आपल्या प्रभागात असून, वाद मात्र भलतेच करीत आहेत, असा गायकवाड यांचा दावा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषानुसार ज्याठिकाणी ३० टक्के नागरिक राहात नाही अशाठिकाणी रस्ते, पाणी, लाईट आणि अन्य सुविधा दिल्या जात नाहीत. मग, गोदावरी नदीच्या पल्याड कोणीच नसताना हा खर्च कशासाठी केला जात आहे, याविषयी गायकवाड यांनी संशय व्यक्त केला आहे. मनपाच्या अंदाजपत्रकाच्या वेळीच या पुलांना विरोध करून आपण खेडे विकासासाठी हा निधी खर्च करावा, अशी सूचना केली होती. त्यानुसारच या निधीचा विनियोग व्हावा, असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक