शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
3
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
4
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
5
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
6
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
7
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
8
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
9
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
10
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
11
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
12
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
13
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
14
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
15
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
16
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
17
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
18
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
19
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा द्या : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 15:38 IST

ब्राह्मणगांव : द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली.

ब्राह्मणगांव : द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांची पाहणी केली, बागलान दौºयावर असताना ब्राह्मणगाव येथील २० हेक्टर क्षेत्रावरील १७ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे शेती पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणीसाठी त्यांनी येथे भेट दिली. द्राक्ष उत्पादक नंदकिशोर भावराव अहिरे यांची आठ एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग पूर्णत: सततच्या पावसामुळे नष्ट झाल्याने लाखो रूपयांचा खर्च पूर्णत: पाण्यात गेल्याने या बागेची पाहणी शेट्टी यांनी केली.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकर्यांना अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. यावेळी श्री.शेट्टी यांनी सांगितले की, कोरड्या पेक्षाही ओल्या दुष्काळात शेतकरी अधिक खचून गेला आहे. खरीप हंगाम गेला, आता रब्बी हंगामही हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्यांनी पिक विमा काढला आहे. तसेच ज्यांचे पीक विमा नाहीत परंतु सततच्या झालेल्या पावसामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी बरोबरच विजिबलमाफी दिली तरच शेतकरी उभा राहू शकेल. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे करावा. शेतकºयांच्या प्रश्नासाठी सत्ता कुणाचीही येवो, शेतकर्यांना मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आसुड ओढु, असा इशारा शेट्टी यांनी दिला. याप्रसंगी संघटनेचे प्रवक्ते संदीप जगताप, साहेबराव मोरे, कुबेर जाधव, सुभाष अहिरे, तुषार शिरसाठ, राजू शिरसाठ, रमेश आहिरे, मविप्र संस्थेचे उपसभापती राघो अहिरे, तंटामुक्ती समतिीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, पंचायत समिती सदस्य अतुल अहिरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक