शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

सातपूर विभागीय कार्यालय : कर्मचाऱ्यांची मागणी

 सातपूर : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत हक्काच्या सुट्यांच्या दिवशी काम केल्याच्या बदल्यात मेहनताना किंवा बदली सुट्या मिळाव्यात, अशी मागणी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी केली आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपआयुक्तांनी २२ जानेवारी रोजी सहाही विभागांना परिपत्रक काढून २३ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान दुसरा व चौथा शनिवार, सर्व रविवार आणि सार्वजनिक सुट्या रद्द केल्याचे सूचित केले होते. आयुक्तांच्या आदेशाचे काटेकोर पालन करीत घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांनी एकही सुटी न घेता तीन महिने नियमित कामकाज केले आहे. नियमित कामकाज केल्यामुळे महापालिकेच्या वसुलीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.सलग तीन महिन्यांत हक्काची एकही सुटी न घेता कामकाज केले आहे. त्यामुळे या अतिरिक्त कामाचा मेहनताना मिळावा किंवा बदल्या सुट्या मिळाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.महापालिकेच्या नाशिकरोड, सिडको, पंचवटी, पूर्व विभाग, सातपूर, पश्चिम विभाग या सहाही विभागातील जवळपास दोनशे ते अडीचशे कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम केले आहे. त्यामुळेच वसुलीचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली असल्याने आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घ्यावी, अशीही मागणी घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)