शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भटके विमुक्त समाज परिषदेतर्फे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:42 IST

भटके विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

नाशिकरोड : भटके विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.भटके विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती समाजाच्या योजना, धनगर समाजाला लागू झालेल्या योजना भटके-विमुक्त समाजाच्या जातींना लागू कराव्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीप्रमाणे महामंडळे व बँकांनी सुशिक्षित बेरोजगारांना दिलेले कर्ज माफ करण्यात यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाप्रमाणे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत योजना राबविण्यात याव्या, भटके विमुक्तांसाठी यशवंतराव चव्हाण वसाहत मुक्त योजना निधीतून तत्काळ घरे बांधण्यात यावी, जात पडताळणीसाठी भटक्या-विमुक्तांच्या समाजासाठी लावलेली १९६१ ची पुराव्याची अट शिथिल करण्यात यावी, विदेशात शिक्षणासाठी समाज कल्याणकडून कर्ज व शिष्यवृत्ती देण्यात यावी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नाव देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.धरणे आंदोलनास भटके विमुक्त समाज विकास परिषदेचे अध्यक्ष रतन सांगळे, मांगूलाल जाधव, सोमनाथ मोहिते, बाळासाहेब नळवाडे, नवनाथ ढगे, उमेश पिंपळे, गिरिजा चौथे, आशा मोहिते, रंजना जाधव, सुनंदा बाविस्कर, रेणुका पिंपळे, बाळासाहेब नळवाडे, डी. के. गोसावी, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक