शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

छिंदमच्या विरोधात राष्टÑवादीचे नाशिक कारागृहाबाहेर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 15:25 IST

शिवजयंती उत्सवाच्या पुर्वसंध्येला अहमदनगर येथे हा प्रकार घडला होता. उपमहापौर छिंदम यांनी महापालिका कर्मचा-याशी भ्रमणध्वनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याची बाब उघडकीस येताच त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. नगर शहरात वातावरण तंग होवून छिंदम यांच्या घरावर दगडफेक

ठळक मुद्देपुण्यभूमीतून हाकला : कारागृह अधिक्षकांकडे मागणी अहमदनगर महापालिकेचे भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम सध्या नाशिकरोड कारागृहात आहे.

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अनुद्गार काढणारे अहमदनगर महापालिकेचे भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना नाशिकच्या पुण्यभुमीतून हाकला अशी मागणी करीत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मागासवर्गीय आघाडीने मंगळवारी दुपारी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाहेर जोरदार निदर्शने करून कारागृह अधिक्षकांना निवेदन सादर केले. छिंदम यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात अहमदनगर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने छिंदम सध्या नाशिकरोड कारागृहात आहे.शिवजयंती उत्सवाच्या पुर्वसंध्येला अहमदनगर येथे हा प्रकार घडला होता. उपमहापौर छिंदम यांनी महापालिका कर्मचा-याशी भ्रमणध्वनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याची बाब उघडकीस येताच त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. नगर शहरात वातावरण तंग होवून छिंदम यांच्या घरावर दगडफेक तसेच कार्यालयाची मोडतोड करण्यात येवून त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला. न्यायालयीन कोठडीत नगरच्या तुरूंगात डांबलेल्या छिंदम यांच्यावर तेथील कैद्यांनी हल्ला केल्याने त्यांच्या जिवीताला असलेला धोका पाहता नाशिकच्या कारागृहात हलविण्यात आले आहे. छिंदम याने समस्त शिवपे्रमींच्या भावना दुखावल्याने त्यांना नाशिकच्या पुण्यभुमीत राहण्याचा अधिकार नाही अशी मागणी करीत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मागासवर्गीय आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाहेरच निदर्शने आंदोलन केले. यावेळी छिंदम व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येवून त्यांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. याप्रसंगी पक्षाच्यावतीने कारागृह अधिक्षकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले, त्यांनी राज्य सरकारकडे भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक