शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेच्या वतीने जिल्ह्यात केंद्राच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:16 IST

नाशिक : शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किसान सभा-आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ...

नाशिक : शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किसान सभा-आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी काळे झेंडे फडकावून केंद्र सरकारविरोधात घाेषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील आंदोलनाची दखल घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

केंद्र सरकारलादेखील सात वर्षं पूर्ण होत असून, गेल्या सात वर्षांच्या कालावधीत केंद्राने शेतकरी, कामगार, कर्मचारीविरोधी धोरण अवलंबिले असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ निषेध दिन पाळण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हातात काळे झेंडे फडकावत निषेध नोंदविला. अनेकांनी आपल्या घरांवर तसेच वाहनांवरही काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा विरोध दर्शविला.

दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करीत असून, ठाण मांडून बसलेले आहेत. त्यास सहा महिने पूर्ण होत असून शेतकरीविरोधी तीन जुलमी कायदे रद्द करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करावेत, लेबर कोड कायदा रद्द करावा, मोफत लस आणि उपचार देण्यात यावा, चार महिने मोफत धान्य देण्यात यावे, बेरोजगारांना ६००० रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प रद्द करण्यात यावा, राज्य सरकारांना जीएसटीचे पैसे देण्यात यावेत, वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचारी घोषित करावे, रोजगार हमी कर्मचाऱ्यांना ३०० रुपये प्रतिदिन देण्यात यावेत, रिक्त पदे भरण्यात यावीत, ईपीएफ पेन्शनर्सला किमान नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्ह्यात ठिकठिकाणी किसान सभेचे राज्य सचिव, आायटकचे जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, संघटक विजय दराडे, सुखदेव केदारे, दत्तात्रय गांगुर्डे, अरुण म्हस्के, सखाराम दुर्गुडे, उज्ज्वल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. सुनीता कुलकर्णी, किरण डावखर, मकसूद अन्सारी, मीना आढाव, देवीदास भोपाळे, सुभाष काकड, भाऊसाहेब शिंदे, प्रकाश नाईक, नरेंद्र कांबळे, चित्रा जगताप, हसीना शेख आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

===Photopath===

260521\26nsk_47_26052021_13.jpg

===Caption===

केंद्राच्या विरोधात निदर्शने करतांना शेतकरी