शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर चूल मांडून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 22:43 IST

येवला : शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने येथील विंचूर चौफुलीजवळ केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व महागाईचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर चूल मांडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देयेवला : रस्त्यावर चूल मांडून राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन

येवला : शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने येथील विंचूर चौफुलीजवळ केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व महागाईचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर चूल मांडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारने नुकतीच गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली. सततची पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळींच्या दरात प्रचंड वाढ होत असल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने विंचूर चौफुलीवर गॅस सिलिंडरला पुष्पहार घालत रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करण्यात आला.या आंदोलनाने मनमाड-कोपरगाव व नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी मोदी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.इंधन दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला प्रचंड भुर्दंड सोसावा लागत असून, महिलावर्गाचे स्वयंपाक घराचे बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच जनता बेजार झाली आहे. व्यवसाय ठप्प झाले आहेत, बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.या परिस्थिती केंद्र सरकारने अडचणीत असलेल्या जनतेला आधार देण्याची गरज असतांना उलट सतत महागाई वाढत आहे. सर्वसामान्य जनतेचा विचार न करता मनमानी केलेली दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या वतीने नायब तहसीलदार बाळासाहेब हावळे यांना देण्यात आले.आंदोलनात येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजश्री पहिलवान, तालुकाध्यक्ष सोनाली कोटमे, नर्गिस शेख, निता बिवाल, विमल शहा, निता बिवाल, सीमा बोडके, निर्मला थोरात, सुचिता थोरात, निगार सकट, मंगल शिंदे, सुमय्या शेख, पुष्पा खलसे, आशा सकट, बागूबाई मोहिन, मुमताज शेख, सोनाली शिंदे, मंगल शिंदे, मीरा खलसे, अनिता लोंढे, मोहिनी खैरनार, ताराबाई शिंदे, बिलकीस पठाण, हिना शेख, सुलोचना रिठे, वनिता कुचेकर, ज्योती रागपसरे, तानाबाई बोडके आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण