शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावरील संरक्षक कठडे तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:14 IST

सप्तशृंगगड : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सप्तशृंगगड घाटातील संरक्षक कठडे व लोखंडी बॅरिकेट्स अजून किती जणांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल वाहनचालक व भाविक करीत आहेत.

ठळक मुद्देधोकेदायक वळण : बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार

सप्तशृंगगड : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सप्तशृंगगड घाटातील संरक्षक कठडे व लोखंडी बॅरिकेट्स अजून किती जणांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल वाहनचालक व भाविक करीत आहेत.येत्या १३ एप्रिलपासून सप्तशृंगगडावर मोठ्या उत्साहात चैत्रोत्सव सुरू होणार असून, यात्रा कालावधीत खासगी वाहनांना बंदी घातली असल्याने लाखो भाविकांना एसटीनेच प्रवास करावा लागतो. इतर दिवशीही ट्रॅव्हल, स्थानिक गाड्या व भाविक स्वत:ची वाहने घेऊन दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु नांदुरी ते सप्तशृंगगडाचा दहा किलोमीटरचा प्रवास भाविकांना अगदी जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे. त्यामुळे या चैत्रोेत्सवातही भाविकांना एसटीत प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.गेल्या सहा महिन्यांपूर्वीच नवरात्र उत्सवानंतर पूजेचे साहित्य घेऊन जाताना गडावरील गणेश घाटात टेम्पोचालकाचा ताबा सुटल्याने अवघड वळणावर सातशे ते आठशे फूट दरीत जाता जाता बॅरिकेटसला वाहन अडकल्याने मोठी दुर्घटना टळली होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून येथील बॅरिकेटस तुटले असून, ते बदलण्याची तसदीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.संरक्षणासाठी लोखंडी बॅरिकेटस लावण्यात आले आहे; परंतु सध्या लोखंडी बॅरिकेटसचे हाल झाले आहेत. काही ठिकाणच्या अपघाती वळणावरचे लोखंडी बॅरिकेटस गायब झालेले दिसत आहे.अपघाती वळण काही बॅरिकेटस तुटलेल्या व वाकलेल्या अवस्थेत त्याच ठिकाणी पडलेले असून, गणेश घाटातील हे अपघाती व अवघड वळण असल्याने येथील वळणावरील येणारी व जाणारी वाहने दिसत नाहीत व येथीलच बॅरिकेटस तुटले असल्याने अपघाताची भीती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा याबाबत भोंगळ कारभार पहायला मिळत आहे.