शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्राला संरक्षक जाळ्या

By admin | Updated: January 22, 2017 23:03 IST

प्रदूषण टाळण्यासाठी उपाय : उच्चाधिकार समितीच्या बैठकीत निर्णय

नाशिक : न्यायालयाने आदेश देऊनही नदीपात्रात कपडे आणि वाहने धुतली जात असल्याने गोदावरी नदीचे प्रदूषण थांबत नसून त्यावर उपाय करण्यासाठी आता नदीपात्राच्या काही भागांत संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात राजेश पंडित यांनी २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल केली असून, त्याअनुषंगाने न्यायालयाने नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन केली असून, समितीची दर दोन महिन्यांनी बैठक घेण्यात येते त्यानुसार विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. नदीपात्रात वाहने आणि कपडे धुण्यास प्रतिबंध केला असतानादेखील हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे काही भागात संरक्षक जाळ्या बसविण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय पोलिसांनी नियम भंग करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेस, असे निर्देशित केले. महापालिकेने गोदावरी नदीच्या काठी निर्माल्य आणि अन्य कचऱ्याचे संकलन करण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करावी म्हणजेच निर्माल्य कलश आणि कचरापेटीची व्यवस्था करावी आणि सर्व कचरा सकाळी ११ वाजता आणि रात्री नऊ वाजता उचलावा, तसेच अधिक मनुष्य बळाची व्यवस्था करून पाणवेली काढण्याची व्यवस्था करावी, गोदावरी नदीच्या तीरावरील मलजल वाहून नेणाऱ्या आणि पुरामुळे फुटलेल्या सर्व मलवाहिका आणि चेंबर्स दुरुस्त करण्याची व्यवस्था करावी, असे ठरविण्यात आले. त्र्यंबकरोडवर पिंपळगाव येथे मलजल प्रक्रिया केंद्र बांधण्यासाठी तातडीने भूसंपादन करावे, अशी महापालिकेला सूचना करण्यात आली. तर नीरीने भूजलस्त्रोतांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्, तसचे महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित होते.