शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नीलकंठेश्वर मंदिराचा संरक्षित वारसा होतोय असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:27 IST

सुंदरनारायण मंदिराप्रमाणेच प्राचीन असलेल्या गोदाकाठावरील श्री  नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे स्थापत्य आकर्षक व देखणे आहे. हे स्मारक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे,

नाशिक : सुंदरनारायण मंदिराप्रमाणेच प्राचीन असलेल्या गोदाकाठावरील श्री  नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे स्थापत्य आकर्षक व देखणे आहे. हे स्मारक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे, मात्र मंदिराचा हा प्राचीन वारसा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अद्याप पावले उचलली नसल्याने मंदिराची काळानुरूप पडझड होत आहे.नीलकंठेश्वर महादेव मंदिराचा इतिहास हा अत्यंत प्राचीन आहे. या मंदिराची वास्तू जनकराजाकालीन असल्याचा उल्लेख १८८३ च्या मुंबई प्रेसिडेन्सी गॅझिटीयरमध्ये आढळतो. या मंदिराबाहेर दशश्वमेघ कुंड गोदापात्रात आहे. या कुं डाभोवती ब्रह्मदेवाने दहा अश्वमेध यज्ञ केल्याची आख्यायिका आहे. २०१४-१५ साली राज्य पुरातत्त्व विभागाने काही प्रमाणात दुरुस्तीचे काम केले होते, त्यानंतर मात्र या विभागाचे मंदिराकडे दुर्लक्ष झाले. नीलकंठेश्वर मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. या मंदिराचे आकर्षण आणि भुरळ चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांनाही पडली आहे. अभिनेता सैफअली खानचा बुलेट राजा असो किंवा आमीरखानचा ‘पीके’ या दोन्ही हिंदी चित्रपटांमधील काही दृश्ये या मंदिराभोवतीची आहेत. नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या वास्तूच्या पाषाणावर करण्यात येत असलेले नक्षीकाम तुटले असून, काही पाषाणही ढासळत आहेत. मंदिरावर पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे काही झाडांची रोपेही उगविल्याचे दिसते. मंदिराचे पाषाण सुरक्षित व्हावे, यासाठी सिंहस्थ कुंभमेळा काळात रासायनिक प्रक्रिया पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आली होती. मंदिराचे गर्भगृहाचे शिखरसह दोन घुमट आहेत. संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणात बांधण्यात आले आहे. मंदिराची अवस्था प्रथमदर्शनी चांगली वाटत असली तरी बारकाईने निरीक्षण केल्यास मंदिराच्या वास्तूवरील नक्षीकाम ढासळत असल्याचे लक्षात येते. मंदिराची वेळोवेळी दुरुस्ती केल्यास पडझड रोखण्यास प्रशासनाला यश येईल....तर दुर्घटना घडू शकतेनीलकंठेश्वरच्या ‘सावली’ला ज्येष्ठ विश्रांतीला असतात. त्यामुळे अचानकपणे मंदिराच्या नक्षीचे दगड ढासळले तर दुर्घटना घडू शकते. या मंदिराच्या पाषाणावरील नक्षीकाम ढासळून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने या मंदिराला सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेNashikनाशिक