शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

चांदवडला भूमिगत गटारीसाठी निधी प्रस्तावित

By admin | Updated: October 22, 2016 23:21 IST

भूषण कासलीवाल : टंचाईकाळात लक्ष; खोकड तलावाच्या साठवण क्षमतेत वाढ

चांदवड : शहराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. टंचाई काळात विशेष लक्ष घातले असून, शहराला महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून सुमारे सात किलोमीटर भूमिगत गटारीसाठी चार कोटी ३९ लाख रुपयांचे काम प्रस्तावित असल्याची माहिती नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढील महिन्यात हे काम सुरु होईल. या गटारीतील पाण्याचे शुध्दीकरण करून हे पाणी जवळपासच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले जाईल. जेणेकरुन नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडेल, असे कासलीवाल यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष कविता उगले, शिवसेना गटनेते व नगरसेवक जगन्नाथ राऊत, कॉँग्रेस गट नेते व नगरसेवक रवींद्र अहिरे, अ‍ॅड. नवनाथ अहेर, देवीदास शेलार, राजकुमार संकलेचा, अल्ताफ तांबोळी, अशपाक खान, बाळु वाघ, नगरसेवक मीनाताई कोतवाल, रेखा गवळी, पार्वताबाई पारवे, लीलाबाई कोतवाल, विलास पवार, बाळासाहेब वाघ, संदीप उगले आदि उपस्थित होते. भविष्यात खोकड तलावाजवळील विहीर, गोई बंधारा, राहुड बंधारा येथे पाणीबुड्या टाकून चांदवड शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियंोजन आहे. खोकड तलावातील गाळ माजी आमदार शिरीष कोतवाल व आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या प्रयत्नाने काढण्यात आला असून, या तलावाची साठवण क्षमता वाढली आहे. लवकरच या तलावाचा सांडवा पडेल व त्याचे जलपूजन करण्याचा मानस राऊत यांनी व्यक्त केला. तर नगराध्यक्ष कासलीवाल यांनी पालकमंत्र्याच्या माध्यमातून धोंडबा ते चांदवड पाणीपुरवठा एक्स्प्रेस पाइपलाइन मंजूर केली आहे, अशी माहिती दिली. चांदवड शहरात होणाऱ्या जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या २० वर्षाचा विचार करुन शहरातील वसाहतीचा सर्व्हे करणार आहे. पुढील काळात मीटरद्वारे पाणी देण्याचा विचार असल्याचे कासलीवाल यांनी सांगितले. गावांतर्गत गटारीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. शहरासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून १७ प्रभागात विकासकामे केली जातील असे सांगण्यात आले. (वार्ताहर)आठवडेबाजारासाठी जागेचा प्रस्ताव गत काळात गटनंबर चुकीचा असल्याने आता तो बदलुन मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यातयेईल चांदवड शहरातील १४०० घरामध्ये शौचालये देण्यात येतील त्यासाठी १७ हजार रुपये निधी देणार आहे. केदं्राकडून १२ हजार व नगरपरिषदेकडून पाच हजार रुपये अनुदान देण्यात येईल असे सांगीतले तर गत काळातील ग्रामपंचायतीचा निधी परत जाऊ नये माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या काळात मंजुर झालेल्या १३ व्या वित्त आयोगातंर्गत गणेशमंदिर ते गणूर चौफुलीचे कामास नुकताच प्रारंभ झाल्याचे जगन्नाथ राऊत यांनी सांगीतले. तर चांदवड शहराचा आराखडा , रस्ते, गटारी, विकासाची कामे करण्यासाठी तज्ञ इंजिनिअर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचे शेवटी नगराध्यक्ष कासलीवाल यांनी सांगीतले.