शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:04 IST

सिन्नर : तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने एैन पावसाळ्यातही पाणी पुरवठ्याची स्थिती वाईट आहे. त्यामुळे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली आहे.

सिन्नर : तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने एैन पावसाळ्यातही पाणी पुरवठ्याची स्थिती वाईट आहे. त्यामुळे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली आहे.यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, अवधूत आव्हाड उपस्थित होते. बैठकीत पाणी टंचाईवर चर्चा करण्यात आली.तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे व वाड्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव येताच त्याची तातडीने पाहणी होवून उपविभागीय अधिकाऱ्यांकडून आलेल्या अहवालानंतर लगेचच टँकर सुरु करणे गरजेचे असल्याचे आमदार वाजे यांनी खेडकर यांना सांगितले. दोडी खुर्द येथील रामोशीवाडी, आव्हाड वस्ती, खंबाळे येथील पिंपळाचा मळा, भालेराव वस्ती, भाबड व वाकचौरे वस्ती, डावरे, टेकाडे, गोफणे वस्तीवर टँकर सुरु करण्याचे लेखी आदेश खेडकर यांनी दिले. शासकीय टँकर पुरेसे नसल्यास खासगी टँकरचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.चौकट- टॅँकरने पाणीपुरवठातालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने भर पावसाळ्यातही ९ गावे ४१ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तीन शासकीय तर सात खासगी टँकरद्वारे ४१ फेºयांतून सुमारे पाच लाख लीटर पाणी पुरवठा केला जात असून पाऊस न झाल्यास टंचाई स्थिती वाढत जाण्याची चिन्हे आहेत.

 

टॅग्स :Waterपाणी