शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

२१ गावांचे टॅँकरसाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 21:31 IST

सुरगाणा : तालुक्यातील एकवीस गावांमधून पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ वरिष्ठ पातळीवरून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहे. तालुक्यातील म्हैसमाळ, गळवड, मोरडा, दांडीची बारी, गावितपाडा, झुंडीपाडा, तोरणडोंगरी, अंबुपाडा, सरमाळ, उंबरपाडा, चाफावाडी, बाफळून, जामनेमाळ, खडकमाळ, पळशेत, देवळा, भेनशेत, उंबरणे, पांगारणे, शिवपाडा व चिंचपाडा या गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे.का ही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असल्याने स्थानिकांना पाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देसात टॅँकर मंजूर : तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरूच

श्याम खैरनार ।लोकमत न्यूज नेटवर्कसुरगाणा : तालुक्यातील एकवीस गावांमधून पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ वरिष्ठ पातळीवरून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहे. तालुक्यातील म्हैसमाळ, गळवड, मोरडा, दांडीची बारी, गावितपाडा, झुंडीपाडा, तोरणडोंगरी, अंबुपाडा, सरमाळ, उंबरपाडा, चाफावाडी, बाफळून, जामनेमाळ, खडकमाळ, पळशेत, देवळा, भेनशेत, उंबरणे, पांगारणे, शिवपाडा व चिंचपाडा या गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे.का ही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असल्याने स्थानिकांना पाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव पाणीटंचाई विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठवून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहेत. पाच टॅँकर शासकीय तर दोन टॅँकर खासगी आहेत. मात्र यावेळी जुने व तकलादू टॅँकर न पाठवता नवे किंवा सुस्थितीतील टॅँकर पाठविण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मोहनराव गांगुर्डे यांनी केली आहे. मागवण्यात आलेले पाणी टॅँकर सॅनेटाइझ केल्यानंतर या टॅँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना येत्या दोन-तीन दिवसात पाणीपुरवठा केला जाणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यात एकही संशयित रु ग्ण नसला तरीदेखील स्थानिक प्रशासन कोरोनासोबतच तालुक्यातील पाणीटंचाईवरदेखील लक्ष ठेवून आहे. पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त होताच सात टॅँकर मंजूर करून घेतले आहेत. हे सर्व टॅँकर निर्जंतुक केले जाणार असून, टॅँकरवर स्थानिक चालक देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. यापुढे जसे प्रस्ताव प्राप्त होतील त्याप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल.- विजय सूर्यवंशी, तहसीलदार लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षसुरगाणा तालुक्यात दरवर्षी ठरावीक गावे व पाड्यांना पाणीटंचाईचा सामोरे जावे लागते. पाणीटंचाई निर्माण झाली की टॅँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव द्यायचा. मग टॅँकर मंजूर होऊन पाऊस पडेपर्यंत ईकडून तिकडून पाणी उपलब्ध करून या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करायचा, गेल्या अनेक वर्षांपासून हे असेच सुरू आहे. काही महिलांनी तर हा प्रकार पिढ्यान् पिढ्या चालू असल्याचे सांगितले. निवडणुकांत अनेक नवे-जुने निवडून येतात, मात्र कुणाही प्रतिनिधिनीने पाणीटंचाई कायमची मिटवण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येत नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हेवेदावे विसरून गेली अनेक वर्षे सुरू असलेली ही पाणीटंचाई कायमची नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे.