शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव केंद्र शासनाला रवाना

By admin | Updated: December 16, 2015 00:22 IST

प्रतीक्षा निकालाची : माकपचा ‘एसपीव्ही’ला विरोध कायम

नाशिक : महापौरांनी भाजपा व माकपा वगळता अन्य सर्वपक्षीय गटनेत्यांच्या स्वाक्षरीने एसपीव्हीचा ठराव सशर्त प्रशासनाला सादर केल्यानंतर आयुक्तांनी तातडीने नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे रवाना केला. अटी-शर्तींसह सदर प्रस्ताव सादर केल्यानंतर आता चॅलेंज स्पर्धेत नाशिक महापालिका उत्तीर्ण होते किंवा नाही, याची प्रतीक्षा नाशिककरांना लागून राहणार आहे. दरम्यान, एकमेव माकपा पक्षाने ‘एसपीव्ही’ला विरोध कायम ठेवला आहे.सोमवारी वरिष्ठ पातळीवर वेगवान घडामोडी होऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला काही अटी-शर्तींवर मान्यता देण्याचे जाहीर केल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी तातडीने सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावून अटी-शर्तींचा मसुदा तयार केला आणि स्वाक्षऱ्या करून तो प्रशासनाला सोमवारी रात्रीच रवाना केला. त्यानंतर आयुक्तांनी सदर ठरावासह स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाच्या संमतीनंतर केंद्र सरकारकडे रवाना केला. लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच माझे काम असल्याने सदरचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असल्याचे आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव उपसूचना व अटीशर्तींसह केंद्राला सादर केल्यानंतर आता केंद्र सरकार नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. देशभरातून शहरांच्या येणाऱ्या प्रस्तावांची छाननी होऊन पंतप्रधानांकडून दि. २६ जानेवारीला अंतिम निवड जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीतील एसपीव्हीसंबंधीचा ठराव महापौरांनी सशर्त प्रशासनाला सादर केला; परंतु एकमेव माकपाने संपूर्ण एसपीव्हीलाच आपला विरोध कायम ठेवला आहे. माकपाचे गटनेते तानाजी जायभावे, माजी नगरसेवक वसुधा कराड व नगरसेवक सचिन भोर यांनी पत्रकार परिषद घेऊन एसपीव्हीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. एसपीव्ही म्हणजे महापालिकेची उरलीसुरली स्वायत्तताच घालविण्याचा डाव असल्याचा आरोप जायभावे व कराड यांनी केला. (प्रतिनिधी)