शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

सिंहस्थ संपल्यानंतर दोन कोटींच्या खरेदीचा प्रस्ताव

By admin | Updated: December 29, 2016 01:04 IST

सिंहस्थ संपल्यानंतर दोन कोटींच्या खरेदीचा प्रस्ताव

नाशिक : सिंंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात अमलात येऊ शकला नाही म्हणून आता कुंभमेळा संपल्याच्या एक वर्षानंतर दोन कोटी १४ लाख रुपयांच्या अ‍ॅनेस्थेशिया वर्क स्टेशनच्या खरेदीचा प्रस्ताव घाटत असून, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कुंभमेळ्यास लाखो साधू-महंत आणि भाविक येणार असल्याने २८ आॅगस्ट २०१२ च्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. परंतु आता कुंभमेळा संपल्यानंतर या वर्षी २२ मार्च आणि १२ एप्रिल तसेच १४ व २१ एप्रिल, २३ एप्रिल अशा निविदा मागविण्यात आल्या आणि त्यातील तांत्रिकता तपासल्यानंतर आता दोन कोटी १४ लाख रुपये खर्च करण्याची तयारी सुरू आहे. कारभारावर प्रश्नचिन्हएकीकडे महापालिका आॅनलाइन होत असून, त्या माध्यमातून गतिशील कारभाराची हमी भरली जात असताना दुसरीकडे मात्र कुंभमेळा संपल्यानंतर एक वर्षानी खरेदी करण्यात येत असल्याने पालिकेच्या गतिशील कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने सिंहस्थात न वापरला गेलेला निधी अन्यत्र वापरण्यास मनाई केली असताना हा प्रकार घडला आहे.