शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या बससेवेचा प्रस्ताव थंड बस्त्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:07 IST

महापालिकेच्या वतीने शहर बससेवेचा प्रस्ताव गेल्या महासभेत सादर न झाल्याने प्रशासनानेदेखील हा प्रस्ताव साईड ट्रॅकला टाकला आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहर बससेवेचा प्रस्ताव गेल्या महासभेत सादर न झाल्याने प्रशासनानेदेखीलहा प्रस्ताव साईड ट्रॅकला टाकला आहे.  महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक चालविण्यासाठी घेण्याबाबत यंदा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेतला असून, शासनाची तशीच भूमिका असल्याने गेल्या डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला स्वत:ची सेवा सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची तयारी दर्शविली होती. दरम्यान, आयुक्तांनी गेल्या महिन्याच्या महासभेत हा प्रस्ताव मांडण्यासाठी धावपळ सुरू केली होती. क्रिसील कंपनीचा प्रस्ताव बाजूला ठेवून आयुक्तांनी पुढाकार घेत स्मार्ट सिटीसाठी नियुक्त सल्लागार कंपनीकडून अहवाल तयार करून घेतला. तीनशे बसच्या माध्यमातून ही सेवा सुरू करताना सर्व बस खासगीकरणातून प्रतिकिलो मीटर या दराने ठेकेदराला रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे.इलेक्ट्रिक आणि डिझेल बसचा विचारसर्व बस इलेक्ट्रिक किंवा निम्या बस डिझेलच्या घेऊन ही सेवा सुरू करण्याचा मानस आहे. गेल्या महिन्याच्या नियमित हा प्रस्ताव आला असता तरी त्यावर विशेष महासभा काढण्याचीच अधिक शक्यता होती. तथापि, करवाढीच्या विषयावरून महासभा गाजली त्यानंतर आयुक्तांनी सादर केलेले विकासकामांचे प्रस्ताव वगळता अन्य सर्व विषय नामंजूर करण्याची भूमिका घेतली. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घाई करणे थांबवले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव थंड बस्त्यात गेल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका