शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

शासनाला प्रस्ताव : लाखभर लोकसंख्येला टॅँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: August 24, 2015 23:34 IST

मनमाडला पाण्याचा ठणठणाट!

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने मनमाड शहरात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. पुढील पाण्याचे आवर्तन मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याने जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या लाखभर लोकसंखेच्या शहराला सध्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यात आवर्तनाची वाट पहात महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीपुरवठा संपुष्टात आल्याने हे धरण कोरडेठाक पडले आहे. शहरातील आययूडीपी भागातील पाणीपुरवठा झाल्यानंतर मुरलीधरनगर येथील टाकीला पाणीपुरवठा सुरू असताना धरणातील पाणी संपल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. बुधलवाडी भागाला या टाकीतून पाणीपुरवठा होत असतो; मात्र पाणीच संपल्याने या भागातील महिलांची पाण्याची प्रतीक्षा फोल ठरली. या भागातील रहिवाशांना १२ दिवसांपूर्वी पाणी मिळाले होते. आता पाण्याचा थेंब कधी मिळणार याबाबत अनिश्चितता व्यक्त करण्यात येत आहे.दोन वर्षापासून वागदर्डी धरण भरलेच नाही. उपलब्धतेअभावी सात दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता १२ दिवसांआड करण्यात येत होता. सध्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने महिलावर्गाची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. त्यामुळे महिलावर्गाचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहे. काही भागात पाण्याच्या टाकीखाली असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत होती; परंतु धरणातील पाणीसाठा संपल्याने पाण्याच्या टाक्यासुध्दा कोरड्याठाक पडल्या आहेत.पालिकेच्या म्हणण्यानुसार ३० आॅगस्टला पाण्याचे आवर्तण मिळणार आहे. सदरचे पाणी वागदर्डी धरणापर्यंत पोहोचण्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे तब्बल दहा-बारा दिवस मनमाडकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. (वार्ताहर)