शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मॉलमध्ये मोफत वाहनतळासाठी महासभेत प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:24 IST

पुण्याच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये नि:शुल्क वाहनतळ व्यवस्था करावी यासाठी प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी प्रस्ताव दिला आहे.

नाशिक : पुण्याच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये नि:शुल्क वाहनतळ व्यवस्था करावी यासाठी प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी प्रस्ताव दिला आहे. येत्या महासभेवर चर्चेसाठी तो मांडण्यात आला असून, सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड वाचणार आहे.शहरात बहुतांशी मॉलमध्ये सशुल्क वाहनतळ आहेत. काही मॉल्समध्ये वाहनतळासाठी एफएसआय माफ करून घेण्यात आला आहे. चटई क्षेत्र मुक्त असलेल्या क्षेत्रात वाहनतळ मोफत न ठेवता त्याचे शुल्क आकारले जाते. मॉलमध्ये शिरतानाच शुल्क भरून घेतल्यानंतर परत जाताना शुल्क भरल्याची पावतीही परत घेतली जात असल्याने हा कर चोरीचा प्रकार असल्याचीदेखील चर्चा आहे. मॉल किंवा तत्सम व्यावसायिक संकुल असेल तर त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांनी पुरेसे वाहनतळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यापार्श्वभूमीवर किरण गामणे यांनी येत्या गुरुवारी (दि.२०) महासभेत हा प्रस्ताव मांडला आहे. मॉलमध्ये केवळ धनिकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही जात असतात. त्यामुळे या ठिकाणी शुल्क घेणे बंद करण्यासंदर्भात कार्यवाही करून संबंधित मॉल्सचालकांना तशा नोटिसा बजवाव्या, अशी मागणी गामणे यांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाParkingपार्किंग