शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दारणातील पंपिंगची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:03 IST

दारणा धरणातील आरक्षित पाण्याची पुरेपूर उचल होत नसल्याने महापालिकेने दारणातील पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केलेला असून, केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे.

नाशिक : दारणा धरणातील आरक्षित पाण्याची पुरेपूर उचल होत नसल्याने महापालिकेने दारणातील पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केलेला असून, केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने दारणा धरणातून यंदा ४०० दलघफू ऐवजी ३०० दलघफू पाणी आरक्षणाची केलेली मागणी जलसंपदा विभागाकडून फेटाळून लावली जाण्याची शक्यता असून, गंगापूर धरणातून १०० दलघफू वाढीव आरक्षण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षाकरिता जलसंपदा विभागाकडे ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविलेली आहे. त्यात गंगापूर धरणातून ४३०० दलघफू, तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाचा समावेश आहे. सन २०१६-१७ या वर्षात महापालिकेने गंगापूर धरणातून ३९५० दलघफू, तर दारणातून ३०२ दलघफू पाण्याची उचल केलेली आहे. यंदा दारणातून ४०० दलघफू ऐवजी त्यातील १०० दलघफू पाणी आरक्षण गंगापूर धरणातून देण्याचा आग्रह महापालिकेने धरला असला तरी, महापालिकेची मागणी मान्य होण्याची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेने दारणा धरणातून पाण्याची अधिकाधिक उचल करता यावी याकरिता दारणा धरणात पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला असून, अमृत योजनेंतर्गत निधीची अपेक्षा करण्यात आली आहे. सन २०१५ मध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी महापालिकेने दारणा धरणातील पाइपलाइन आतपर्यंत नेली होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे २०० दलघफू पाण्याची होणारी उचल ३०० दलघफूवर जाऊन पोहोचली होती. आता दारणा धरणातील ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या पंपिंग स्टेशनची क्षमता १०० दशलक्ष लिटर्स क्षमता करण्याचा प्रस्ताव असून, अमृत योजनेंतर्गत ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. सदर क्षमता वाढल्यास नाशिकरोड विभागाला दारणातून बारमाही पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.