शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या निर्मितीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 01:56 IST

नाशिक जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने सोळा ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, गेल्या आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ग्रामपंचायतींच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

नाशिक : जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने सोळा ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, गेल्या आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ग्रामपंचायतींच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.सुरगाणा, बागलाण, कळवण, दिंडोरी या चार तालुक्यातील आदिवासी ग्रामपंचायतींच्या विभाजनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे या ग्रुप ग्रामपंचायतीतून चंद्रपूर, चिंचले, पांगारणे, सोनगीर, उदमाळ या नवीन, तर हट्टी ग्रामपंचायतीतून करवंदे, श्रीभुवन, मोठा माळ या तीन नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात येणार आहे. बागलाण तालुक्यातील दºहाणे ग्रामपंचायतीतून इंदिरानगरची निर्मिती करण्यात येणार आहे. कळवण तालुक्यातील पिंपळे बु.मधून सावरपाडा, मळगाव खु.मधून मळगाव बु; दरेभणगीमधून धनेर दिगर, वाडी बु. मधून एकलहरे, नाळीद ग्रामपंचायतीतून भांडणे (पिंपळे) व इन्शी या दोन ग्रामपंचायतींची तर आंबेवणी ग्रामपंचायतीतून घोडेवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात येणार आहे.अशी होते नवीन ग्रामपंचायत निर्मितीबिगर आदिवासी तालुक्यात ज्या गावांची लोकसंख्या दोन हजाराच्या वर असेल व आदिवासी तालुक्यातील गावाची लोकसंख्या एक हजार असेल अशा गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत निर्मिती करता येऊ शकते अथवा ग्रुप ग्रामपंचायत असेल तर त्यापासून विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती केली जाते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत