शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

१६ नव्या आरोग्य केंद्रांचा प्रस्तावमहापालिका : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान

By admin | Updated: June 15, 2014 18:23 IST

१६ नव्या आरोग्य केंद्रांचा प्रस्तावमहापालिका : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान

 

नाशिक : शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटकांना तत्काळ आवश्यक त्या सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत नवीन १६ आरोग्य केंद्रे प्रस्तावित करण्यात आली असून, येत्या महासभेत त्यावर चर्चा होणार आहे. देशातील शहरी लोकसंख्येचा वाढता वेग आणि त्या शहरातील असंघटित कामगारांसह आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात येणारी आरोग्य सुविधा अपूर्ण असून, त्यासाठी शहरी भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मानांकने निश्चित करण्यात आली आहेत. त्यात २५० ते ५०० लोकसंख्येकरिता एक महिला आरोग्य समिती, एक हजार ते २५०० लोकसंख्येसाठी एक कम्युनिटी हेल्थ सेंटर, १० हजार लोकसंख्येसाठी एक परिचारिका, ५० हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असे उपाय सुचविण्यात आले आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात सध्या ३२ शहरी आरोग्य केंद्रांची आवश्यकता असून, त्यापैकी १६ केंद्रे कार्यान्वित असून १६ शहरी आरोेग्य केंदे्र प्रस्तावित आहेत. त्यासाठी संबंधित मनुष्यबळ भरण्यासाठी महानगरपालिका स्तरावर समिती गठीत करण्यात येणार असून त्याद्वारे थेट मुलाखतीतून पदेही भरण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या येत्या महासभेत चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)