शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा तालुक्यात मद्यासह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 01:43 IST

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा गावाच्या हद्दीत छापा मारून विविध प्रकारचा मद्यसाठा व सदर मद्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने असा सुमारे १ कोटी ५८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे. 

ठळक मुद्देउत्पादन शुल्कचा छापा : पुण्याच्या भरारी पथकाची कारवाई

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा गावाच्या हद्दीत छापा मारून विविध प्रकारचा मद्यसाठा व सदर मद्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने असा सुमारे १ कोटी ५८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे. भरारी पथकाने गुरुवारी (दि. २१) महाराष्ट्र - गुजरात सीमेजवळ सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा - परगाणा रोडवर एका पत्र्याच्या शेडसह आजूबाजूला छापा मारला. यावेळी दादरा व नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाकरिता निर्मित व विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला. पथकाने हा मद्यसाठा जप्त करतानाच सदर मद्याची बेकायदेशीर वाहतूक करण्याकरिता वापरण्यात आलेला आयशर कंपनीचा टेम्पो (क्रमांक डीएन ०९ एस ९७७४), आयशर कंपनीचा टेम्पो (क्रमांक डीएन ०९ यु ९४४८), फोर्स कंपनीचे क्रूझर वाहन (क्रमांक एमएच ४१ सी ६७८२), मारूती सुझुकी कंपनीचे वाहन (क्रमांक एमएच ०३ अेआर ९९१७) असा एकूण १ कोटी ५८ लाख २२ हजार ५०४ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी गिरीश भिका पवार (२३, रा. उंबरठाण, ता. सुरगाणा), हेमंत झांबरू मोरे (२२, रा. बापळून, ता. सुरगाणा) व शैलेश महादू गावित (३०, रा. सातवाकल, ता. धरमपूर, जि. बलसाड, गुजरात) यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करणाऱ्या पथकात निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड, एस. व्ही. बोधे व जवान कांबळे, शेख, नेमाडे, कदम, झिंगळे यांचा समावेश हाेता. गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक दिगंबर शेवाळे करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकliquor banदारूबंदी