नाशिक : मालमत्ता कराच्या थकबाकी प्रकरणी महापालिकेने जप्त केलेल्या ५० मिळकतींसाठी लिलाव प्रक्रिया बुधवारी (दि. २५) राबविली. परंतु लिलावापूर्वीच ११ मिळकतधारकांनी थकबाकीची रक्कम भरल्याने पालिकेच्या खजिन्यात ५७ लाख ६८ हजार रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, ३९ थकबाकीदारांच्या मिळकतींसाठी कोणाकडूनही बोली न आल्याने संबंधितांचा लिलाव तहकूब करण्यात आल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे. महापालिकेने मालमत्ता कर थकविणाऱ्या मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. यापूर्वी महापालिकेकडून सदर मिळकतींना सील ठोकण्याची कारवाई केली जात होती. परंतु यंदा मिळकती जप्त करून त्यांची लगेचच लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेने सुमारे ४२५ हून अधिक मिळकतींवर जप्तीची कारवाई केली होती. त्यातील ५० मिळकतींसाठी बुधवारी (दि.२५) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र या लिलाव प्रक्रियेला प्रतिसादच मिळाला नाही. लिलावापूर्वी ११ मिळकतधारकांनी थकबाकीचा भरणा केल्याने त्यांची लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली. महापालिकेला या मिळकतधारकांकडून ५७ लाख ६८ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला. उर्वरित ३९ थकबाकीदारांच्या लिलाव प्रक्रियेत कोणाकडूनही बोली आली नाही. त्यामुळे सदर मिळकतींची लिलाव प्रक्रिया तहकूब करण्यात आली. सदर मिळकतींसाठी पुन्हा एकदा लिलाव प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.
मालमत्ता कर : बोली न आल्याने ३९ मिळकतींचा लिलाव तहकूब ११ थकबाकीदारांकडून भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:56 IST
नाशिक : मालमत्ता कराच्या थकबाकी प्रकरणी महापालिकेने जप्त केलेल्या ५० मिळकतींसाठी लिलाव प्रक्रिया बुधवारी (दि. २५) राबविली.
मालमत्ता कर : बोली न आल्याने ३९ मिळकतींचा लिलाव तहकूब ११ थकबाकीदारांकडून भरणा
ठळक मुद्दे कोणाकडूनही बोली न आल्याने संबंधितांचा लिलाव तहकूब मिळकतधारकांनी थकबाकीचा भरणा केल्याने लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली