शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

आज थंडावणार  जिल्ह्यात प्रचार तोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 1:32 AM

नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची बुधवाारी (दि. १३) सायंकाळी सांगता होणार आहे.  यंदा उमेदवारांना प्रचारासाठी अवघे आठच दिवस मिळाले. त्यातही पावसामुळे दोन दिवस वाया गेले. त्यामुळे गावागावात प्रचाराची रणधुमाळी उडाली होती.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : शुक्रवारी होणार मतदान 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची बुधवाारी (दि. १३) सायंकाळी सांगता होणार आहे.  यंदा उमेदवारांना प्रचारासाठी अवघे आठच दिवस मिळाले. त्यातही पावसामुळे दोन दिवस वाया गेले. त्यामुळे गावागावात प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत प्रचार यंत्रणा राबविली.  जिल्ह्यातील ५८९५पैकी १६२२ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित जागांसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे.  एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. कळवण २९, येवला ६९, इगतपुरी ८, दिंडोरी ६०, त्र्यंबकेश्वर ३, सिन्नर १००, निफाड ६५, बागलाण ४०, चांदवड ५३, देवळा ११, नांदगाव ५९, मालेगाव ९९, नाशिक २५ या ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. २१३२ प्रभागात होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी सायंकाळी प्रचार संपुष्टात येताच दुसऱ्या दिवशी निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. दिनांक ४ जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप होताच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेठी घेण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या आश्वासनांचीही खैरात करण्यात आली. काही गावांमध्ये पक्षीय राजकारणाचेदेखील पडसाद दिसून आले.  यंदा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी व्यापक प्रयत्न झाले. मात्र, उमेदवारी कायम राखणाऱ्या उमेदवारांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. पावसाचा व्यत्यय आणि उर्वरित एका दिवसात प्रचार आणखी शिगेला पोहोचण्याची तसेच शक्तिप्रदर्शनाची तयारी उमेदवारांनी केलेली आहे. प्रशासकीय तयारी येत्या १५ तारखेला मतदान होणार असल्याने मतदानाच्या एक दिवस आधी मतदान कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. त्यानुसार तालुका पातळीवर कर्मचारी तसेच त्यांच्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचे नियोजन करण्यात आले. केंद्रांवर पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी कर्मचारी आपापल्या केंद्रांवर पोहोचतील. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील १९३३ मतदान केंद्रांवर सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक