शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रोजेक्ट गोदा ; गोदावरीचे बदलणार स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:06 IST

दक्षिणगंगा असलेल्या गोदावरी नदीचे रूपडे पालटविण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा राबविण्यात येणार असून, त्यासाठी मागविलेल्या निविदा मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नव्या वर्षात गोदावरी नदीचे रूप बदलण्याची शक्यता आहे.

नाशिक : दक्षिणगंगा असलेल्या गोदावरी नदीचे रूपडे पालटविण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा राबविण्यात येणार असून, त्यासाठी मागविलेल्या निविदा मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नव्या वर्षात गोदावरी नदीचे रूप बदलण्याची शक्यता आहे.  दोन किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचा विकास करण्यात येणार आहे. रामवाडी पूल ते होळकर पूल तेथून पुढे गाडगे महाराज पूल आणि त्या पलीकडे टाळकुटे पूल असे तीन टप्पे करण्यात येणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात म्हणजे रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान, मनोरंजन आणि अन्य सुविधा केंद्र असणार असून तेथे वॉक वे, अ‍ॅपी थिएटर, अ‍ॅक्युप्रेशर पाथवे, बोर्डेक्स मिरर इफेक्ट,जेट्टी, सायकल मार्ग, दगडी बाक प्रस्तावित  आहे.दुसऱ्या टप्प्यात अध्यात्मिक क्षेत्र तर तिसºया टप्प्यात वाहनतळ आणि अन्य सुविधा असणार आहेत. याशिवाय या प्रकल्पांतर्गत होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेटदेखील बसवण्यात येणार असून फॉरेस्ट पूल ते होळकर पूल दरम्यान ३.२० किमीचा गोदापात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. सध्या रामकुंडालगत असलेले वाहनतळदेखील अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे.महापालिकेने यासंदर्भात निविदा मागवल्या असून, एकच निविदा प्राप्त झाली आहे. सदरची निविदा मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. नव्या वर्षात गोदावरी नदीचे रूप बदलण्यास प्रारंभ झाला असेल असे महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने कळवले आहे.गंगाआरतीला मुहूर्त लागणार?स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदीचे रूपडे बदलणार असून, गंगाआरती पर्यटन विकास महामंडळ सुरू करणार आहे. अर्थात, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तशी घोषणा केली असली तरी आरतीला मुहूर्त लागलेला नाही.

टॅग्स :godavariगोदावरीSmart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका