शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा मिरवणुकीद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:22 IST

कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना आजही आग्रही आहेत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरात शुक्रवारी (दि.२०) बलीप्रतिपदेला गोल्फ क्लब ते अशोकस्तंभापर्यंत बळीराजा मिरणूक काढून सरकारविरोधी आंदोलन केले.

नाशिक : कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना आजही आग्रही आहेत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरात शुक्रवारी (दि.२०) बलीप्रतिपदेला गोल्फ क्लब ते अशोकस्तंभापर्यंत बळीराजा मिरणूक काढून सरकारविरोधी आंदोलन केले.  सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे. संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील शेतकरी व वेगवेगळ्या शेतकरी संघटना आजही आग्रही आहोत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरातून बळीराजा मिरवणूक काढली. सुकाणू समितीने सरकारवर कर्जमाफीचे गाजर दाखवून फसवणूक करण्याचा आरोप केला असून, सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.  सरकारने शेतकºयांना सरकट कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यभरात एक कोटी चार लाख शेतकरी आहेत. परंतु सरकारच्या जाचक अटींमुळे सुमारे ५८ लाख शेतकरी कर्जमाफीचे अर्जच करू शकलेले नाही, तर अर्ज करणाºया अनेक शेतकºयांनाही या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे वगळले जाणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे  राज्यात कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकºयांच्या आत्महत्या सुरू आहे.  या आत्महत्यांना सरकारचे शेती विरोधी घोरण जबाबदार असून, अशा शेती व शेतकरी विरोधी धोरणातील अंमलबजावणी करणाºया सरकारवर शेतकºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने बळीराजा मिरवणुकीच्या माध्यमातून केली असून, या मागण्यांचे निवेदनही पोलीस आयुक्तांना दिले आहे. पोलीस प्रशासनातर्फे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी सुकाणू समितीचे निवेदन स्वीकारले. सुकाणू समितीने काढलेल्या या बळीराजाची मिरवणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, किसानसभा आदी विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शहर परिसरातील शेतकºयांनी सहभाग घेत आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला.