शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नांदूरशिंगोटेत फलक फाडल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:40 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडल्याने गावात सर्वपक्षीय व समर्थकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी निषेधाचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांना देण्यात आले.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडल्याने गावात सर्वपक्षीय व समर्थकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी निषेधाचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांना देण्यात आले.मंगेश लक्ष्मण शेळके व कार्यकर्त्यांनी याबाबत वावी पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकांविरोधात तक्र ार दाखल केली आहे. येथील रेणुकामाता मंदिर परिसरात वाढिदवस व विविध कार्यक्र म होणार असल्याचा फलक आयोजकांनी लावला होता. सदर फलकावर माजी आमदार कोकाटे यांच्यासह विविध मान्यवरांचे फोटो होते. अज्ञात समाजकंटकांने फलकावर असलेल्या कोकाटे यांचा फोटो फाडल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे. संबंधित अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी समर्थकांनी निषेध व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे.सदर घटनेची तातडीने दखल घेत वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी नांदूरशिंगोटे येथे धाव घेतली. समर्थकासह त्यांनी घटनेची पाहणी करून नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी बाजार समतिीचे संचालक लक्ष्मण शेळके, सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच भारत दराडे, विनायकराव शेळके, दीपक बर्के, कैलास बर्के, संजय आव्हाड, तुकाराम मेंगाळ, संदीप शेळके, निवृत्ती शेळके यांच्यासह गावातील पदाधिकारी उपस्थित होते.गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, यापुढे गावात सार्वजनिक कार्यक्रमाचे फलक लावतांना ग्रामपंचायतीची परवानगी घेण्याचे आवाहन बोरसे यांनी केले. सर्व जाती धर्माचे लोक येथे राहत असून हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने राजकीय दृष्टीने अत्यंत जागरूक असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत ग्रामपंचायतीला काही नियामवली देण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले. फलक फाडण्याचा प्रकार चुकीचा असून पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच गोपाळ शेळके यांनी यावेळी निषेध केला.यावेळी अनिल सहाणे, सुदाम आव्हाड, संजय आव्हाड, तुकाराम मेंगाळ, रमेश शेळके, दत्तात्रय मुंगसे, अशोक गवारे,दत्तू शेळके, गणेश घुले, संजय शेळके, संदीप मुंगसे, अरु ण शेळके, अक्षय शेळके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक