नाशिक : राज्य सरकारने दुष्काळी सेस पेट्रोल-डिझेलवर लावून इंधनाचे दर भडकवल्याबद्दल राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने नाशिकरोड येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात आले. राज्यात एलबीटी रद्द झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणे अपेक्षित असताना राज्य सरकारने उलट त्यात वाढ केली आहे. त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून हे मूक आंदोलन करण्यात आले. यात शहराध्यक्ष अंबादास खैरे, मनोहर कोरडे, निवृत्ती अरिंगळे, विक्रम कोठूळे, विक्रम देशमुख, वैभव देवरे, सनी ओबेरॉय, राहुल तुपे, मुकेश शेवाळे, संदीप खैरे, अमोल नाईक, संतोष जगताप उपस्थित होते.
दरवाढीच्या निषेधार्थमूक आंदोलन
By admin | Updated: October 2, 2015 22:54 IST