शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता संघटनेकडून निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 01:23 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंत्याच्या डोक्यावर आमदार नितेश राणे  आणि स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखलाची बादली ओतल्याच्या घटनेचा जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांतील अभियंते आणि कनिष्ठ अभियंता संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करीत घोषणा देण्यात आल्या.

नाशिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंत्याच्या डोक्यावर आमदार नितेश राणे  आणि स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखलाची बादली ओतल्याच्या घटनेचा जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांतील अभियंते आणि कनिष्ठ अभियंता संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करीत घोषणा देण्यात आल्या. तसेच या प्रकाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.महामार्गावर झालेल्या खड्डे आणि चिखलाबाबत राष्टय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता शेडेकर यांना महामार्गावरील गडनदी पुलावर शिवीगाळ, दमदाटी करीत डोक्यावर चिखलाची बादली ओतण्याचा प्रकार करण्यात आला, असा आरोप आहे. अशा प्रकारांमुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांचे मनोबल खचत  असल्याने या संपूर्ण प्रकाराचा निषेध कनिष्ठ अभियंता संघटनेच्या वतीने करण्यात आला.लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अशा वर्तनामुळे अधिकारी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे सांगून दोषींवर तातडीने कारवाईची मागणीदेखील करण्यात आली. यापुढे कोणत्याही अभियंत्याबाबत असा प्रकार घडू नये़ अशी मागणीही यावेळी करण्यात आली़ सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, यांत्रिकी विभाग यांसह विविध विभागांच्या अभियंत्यांनी या निषेध आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे सचिव दिलीप चव्हाण, जगदीश महाजन, प्रदीप पाटील, शंकर शेवाळे, किशोर जोशी, अमोल बागुल, रूही आहेर, गजानन अहिरे, वि. म. कापडणीस, के. एम. पवार, ए. बा. भामरे, ज. व. महाजन यांच्यासह अन्य अधिकारी आणि अभियंत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.यावेळी हम सब एक हैं, अन्याय दूर झालाच पाहिजे अशा घोेषणांसह निषेधाचे फलक बांधकाम विभागात करण्यात आलेल्या आंदोलनात झळकवण्यात आले. तसेच अनेक महिला आणि पुरुष अभियंत्यांनी निषेध असे लिहिलेल्या गांधीटोप्या घालून देखील घटनेचा निषेध केला.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Governmentसरकार