शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचारास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:19 IST

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रदेखील वाढत आहेत. परंतु हॉटस्पॉट ठरलेल्या भागात मनाई असताना नागरिक मुक्तसंचार करीत असतात. यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या शुक्रवारी (दि.१०) संयुक्त दौºयात हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देफौजदारी गुन्हा दाखल होणार : कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेला पोलिसांची रसद

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रदेखील वाढत आहेत. परंतु हॉटस्पॉट ठरलेल्या भागात मनाई असताना नागरिक मुक्तसंचार करीत असतात. यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या शुक्रवारी (दि.१०) संयुक्त दौºयात हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे हॉटस्पॉट ठरलेल्या भागात नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि रुग्णसंख्या आटोक्यात यासाठी आता वाढीव पोलिसांची रसद महापालिकेला मिळणार आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरात दिवसाकाठी दोनशे रुग्ण आढळू लागले आहेत. काही भागात विशेषत: दाट वस्तीत रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा हॉटस्पॉट भागाचा संपूर्ण परिसरच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील न्संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र, तसे होताना दिसत नसल्याने आता प्रतिबंधित क्षेत्रातून नागरिक बाहेर पडल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या दौºयात नगरसेवक जगदीश पवार, पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, डॉ. कल्पना कुटे जयश्री सोनवणे, विवेक धांडे, स्वप्नील मुदलवाडकर, महेंद्र पगारे यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी झाले होते.तर कलम १८८ अन्वये कारवाई !प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी घराबाहेर पडण्यास आणि या भागात येण्यास मज्जाव असून, त्याची काटेकार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गर्दी केल्यास कलम १८८ अन्वये कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आरोग्य सेवकांच्या सुरक्षिततेविषयीदेखील यावेळी चर्चा करण्यात आली.प्रतिबंधित क्षेत्रासाठी वाढीव पोलीसदेखील नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी करणे, रहिवाश्यांना असेर्निक गोळ्यांचे वाटप करण याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना वाहनांमधून सूचना देण्याचे ठरविण्यात आले आहे.जागेची पाहणीशुक्रवारी (दि.१०) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी फुलेनगर, जुने नाशिक, सारडा सर्कल,महेबूबनगर, गोसावीवाडी तसेच नियोजित कोविड सेंटर असलेल्या पंडित कॉलनीतील माहेश्वरी व जैन ओसवाल बोर्डिंगच्या जागेची पाहणी केली. यावेळी याबाबत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या