शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टेकड्यांलगतच्या भागात बांधकामास मनाई शासन निर्देश : टेकड्यांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:40 IST

नाशिक : राष्ट्रीय हरित प्राधिकरणच्या आदेशानुसार महापालिका हद्दीत अस्तित्वात असलेल्या टेकड्यांलगतच्या १०० फूट क्षेत्रात कोणतेही बांधकाम करण्यास शासनाने मनाई केली आहे. यापूर्वी ज्या भागात अधिकृतपणे विकास झाला असेल, त्यामध्ये वाढीव बांधकामासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक अथवा टीडीआर देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या या निर्देशानुसार, नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील अस्तित्वातील टेकड्यांची पडताळणी करण्याच्या सूचना त्या त्या विभागातील उपअभियंत्यांना दिल्या आहेत.

ठळक मुद्दे टेकड्यांलगतच्या भागात बांधकामास मनाई शासन निर्देशराष्ट्रीय हरित प्राधिकरणच्या आदेशानुसार महापालिका हद्दीत अस्तित्वात असलेल्या टेकड्यांलगतच्या १०० फूट क्षेत्रात कोणतेही बांधकाम मनाई

नाशिक : राष्ट्रीय हरित प्राधिकरणच्या आदेशानुसार महापालिका हद्दीत अस्तित्वात असलेल्या टेकड्यांलगतच्या १०० फूट क्षेत्रात कोणतेही बांधकाम करण्यास शासनाने मनाई केली आहे. यापूर्वी ज्या भागात अधिकृतपणे विकास झाला असेल, त्यामध्ये वाढीव बांधकामासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक अथवा टीडीआर देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या या निर्देशानुसार, नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील अस्तित्वातील टेकड्यांची पडताळणी करण्याच्या सूचना त्या त्या विभागातील उपअभियंत्यांना दिल्या आहेत.पुणे जिल्ह्यातील कात्रज घाटातील टेकड्या फोडून होणाºया अनधिकृत बांधकामांच्या अनुषंगाने राष्टÑीय हरित प्राधिकरणच्या आदेशानुसार, डोंगरमाथ्यावर तसेच टेकडीच्या उताराच्या खालच्या भागापासून १०० फूट अंतरापर्यंत बांधकामास परवानगी देण्यात येऊ नये, अशा सूचना राज्यातील सर्व महापालिकांना शासनाने दिलेल्या आहेत. विशेष म्हणजे डोंगरमाथा तसेच डोंगर उतारावरील १.५ पेक्षा तीव्र उताराच्या जमिनीवर कोणताही विकास अनुज्ञेय होत नसल्याबाबत यापूर्वीच विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद समाविष्ट करण्यात आलेली आहे. दरम्यान, शासनाच्या नगरविकास विभागाने दि. १४ नोव्हेंबर २०१७ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, टेकड्यांलगतच्या १०० फूट परिसरात विकास झालेला नसल्यास ते क्षेत्र नाविकास विभागात/ खुल्या स्वरूपाच्या आरक्षणाकरिता दर्शविण्याची कार्यवाही करण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार, सहाही विभागांतील उपअभियंत्यांना अस्तित्वातील टेकड्यांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १.५ पेक्षा तीव्र उताराच्या जमिनी असल्यास शासन निर्देशानुसार कार्यवाही होईल.- आकाश बागुल, सहायक संचालक, नगररचना, मनपा