शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाच्या ‘काळ्या गुढ्या’ उभारून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 17:58 IST

सिन्नर : गेल्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याचे आश्वासन देत शिवसेना-भाजपने राज्यात सत्ता मिळविली. मात्र चार वर्षे होऊनही शासन धनगर समाजला आरक्षण देण्यात चालढकल करत असल्याने समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून, मनेगाव येथे धनगर समाजबांधवांनी घरावर काळ्या कापड्याच्या गुढ्या उभारून शासनाचा निषेध नोंदविला.

सिन्नर : गेल्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याचे आश्वासन देत शिवसेना-भाजपने राज्यात सत्ता मिळविली. मात्र चार वर्षे होऊनही शासन धनगर समाजला आरक्षण देण्यात चालढकल करत असल्याने समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून, मनेगाव येथे धनगर समाजबांधवांनी घरावर काळ्या कापड्याच्या गुढ्या उभारून शासनाचा निषेध नोंदविला.आरक्षणासाठी धनगर समाजाने आता राज्यभर एल्गार पुकारलेला असून, त्याचाच एक भाग म्हणून धनगर समाजबांधवांनी आपापल्या घरावर शासनाच्या निषेधार्थ ‘काळ्या गुढ्या’ उभाल्या. अनुसूचित जमाजी प्रवर्गात असलेल्या ‘धनगड’ ही जात अस्थित्वात नसून धनगर हे धनगड आहेत. त्याच धर्तीवर धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज करत आहे. तथापि, वेळोवेळी राजकारण्यांनी समाजाला आरक्षणाचे ‘गाजर’ दाखवून सत्ता मिळविली. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने प्रचारादरम्यान सत्ता मिळताच समाजाला मागणीप्रमाणे आरक्षण देवू, असे आश्वासन दिले. त्यामुळे राज्यभरातील समस्त धनगर समाजबांधव भाजप-शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले व केंद्रातील तसेच राज्यातील सत्ता मिळवून देण्यात हातभार उचलला. आरक्षण देण्याचा विसर पडला. गेल्या चार वर्षांत समाजाच्या वतीने शांततेत मोर्चे काढून, निवेदने देवून आरक्षणाची मागणी केली, मात्र त्याकडे शासन दुर्लक्ष करीत असून समाजाला आरक्षण देण्यास चालढकल करीत असल्याची समाजाची भावना झाली आहे. त्यामुळे समाजाचे नेते गोपीचंद पडवळ व उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली समाजाने एल्गार पुकारून महाराष्टÑभर शासनाच्या विरोधात वेगवेगळे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. १२ ते १९ डिसेंबर या कालवधीत धनगर समाजबांधवांनी आपापल्या घरांवर ‘काळ्या गुढ्या’ उभारल्या आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक