नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (दि.२६) पुणे येथील संत सेवा संघाचे गोडबोले महाराज यांचे ‘नामस्मरण सुखाचा मार्ग’ या विषयावर प्रवचन होणार आहे. शुक्रवारी स्वराभिषेक हा भावगीत आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी श्रीराम जयंतीचा मुख्य सोहळा होणार आहे. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव कार्यक्रम होईल, तर रात्री नऊ वाजता गीतरामायण गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यात आबासाहेब हिंगणे, श्रीकांत मटकरी,भूषण मटकरी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत मटकरी यांनी केले आहे.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त चांदोरीत कार्यक्रम
By admin | Updated: March 25, 2015 00:54 IST