शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांचे असहकार..

By admin | Updated: March 5, 2017 00:51 IST

येवला : मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावीची रोज एकच उत्तरपत्रिका तपासून, उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत असहकार पुकारला आहे.

. येवला : आश्वासन देऊनही शासनाने अनुदान देण्यासह प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले. या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावीची रोज एकच उत्तरपत्रिका तपासून, उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत असहकार पुकारला आहे. हे असहकार आंदोलन इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेपासून सुरू झाले आहे. मागण्यांची दखल घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे.नाशिक येथे सर्व नियामकांनी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. संजय शिंदे, जिल्हा सचिव प्रा. अनिल महाजन यांच्या सहीनिशी मंडळाचे सचिव आर. आर. मारवाडी यांना मागण्यांचे निवेदन दिले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून, शासनाने सर्व मागण्यांची महिन्यात अंमलबजावणी करण्याचे महासंघास आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. त्यावेळी झालेल्या चर्चेत तीन निर्णय घेऊन १५ दिवसांत आदेश काढण्याचे शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कृती झालेली नसल्यामुळेच बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. आमची भूमिका आडमुठेपणाची अजिबात नाही उलट शासनाकडून आमची व पालक - विद्यार्थी यांची दिशाभूल सुरू आहे, असे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून, रोज एकच उत्तरपत्रिका तपासण्याचे संघटनेने ठरविले आहे. आमच्या मागण्या रास्त असून, त्याची दखल घ्यावी, अशी मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रा.एम.पी. गायकवाड, प्रा. के.एन. धनवटे, प्रा. ए.टी. ठोले, प्रा. संतोष विंचू यांच्यासह प्रा. पी.ए. कोकणे, प्रा. बी.पी. शेलार, प्रा.बी.एस. पैठणकर, प्रा. डी.बी.मुडे, प्रा. एस.एस. सोनवणे, प्रा. एस.पी. वाबळे, प्रा. सी. एच. जोशी, प्रा. एस. एस. बेंद्रे, प्रा. बी. एस. दराडे, प्रा. एस. आर. सोनवणे आदिंनी केली आहे.