शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 18:26 IST

देशमाने गाव व परिसरात अल्प पावसावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या; पण पावसाने घेतलेली विश्रांती अन मका पिकावरील अळीने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.

ठळक मुद्देऔषधांचा उपयोग होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

देशमाने : गाव व परिसरात अल्प पावसावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या; पण पावसाने घेतलेली विश्रांती अन मका पिकावरील अळीने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.खते, बियाणे उधार-उसनवारी करीत घेतले. अल्पपावसाच्या ओलीवर खरिपाची पिके उभी केली. मात्र गत ५ दिवसांपासून पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग आदी पिके कोमजू लागली आहेत. चाऱ्याचा यक्ष प्रश्न उभा ठाकल्याने शेतकऱ्यांनी मका पिकाची अधिक लागवड केली. मात्र मका पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. मका पिकावर अळीचा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे महागड्या औषधांची फवारणी शेतकरी करत आहे. काही ठिकाणी तर औषधाच्या दोनदा फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी न होता वाढल्याने पिकावर नांगर फिरवायची वेळ आली आहे. पेरणी नंतरचा सर्व खर्च व वेळ वाया गेल्याने पुढे काय ? जनावरांचा चारा संपलेला आहे. चाºयासाठी मका पिक एकमेव पर्याय असून अळीमुळे पिकच नष्ट होत आहे. पाऊस उघडल्याने महागड्या औषधांच्या फवारणीमुळे पिके पिवळी पडून कोमेजू लागली आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त बनला आहे. देशमाने (खु) शिवारात मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव असून ताऊबा दुघड, संजय जाचक, सोन्याबापू दुघड, रामभाऊ दुघड, भाऊसाहेब दुघड आदींचे मका पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून सुचविण्यात आलेले उपाय व पर्याय जुजबी ठरत असल्याने अळीचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती