वणी : गेल्या दोन दिवसांपासुन वातावरणात कमालीचा बदल झाला असुन तपमान घसरल्याने द्राक्षउत्पादकांची चिलबचल वाढली आहे. वणी व परिसरात थंडीचा प्रभाव वाढला आहे.ठरलेल्या दरात व्यवहार फिस्कटण्याची शक्यता अधिक असल्याच्या भितीनेही उत्पादकांना हैराण केले आहे.दरम्यान द्राक्ष विक्र ी व्यवहारात फसवणुक होऊ नये म्हणुन परीचीत कंपन्या मार्फत परदेशात द्राक्ष विक्र ी चा निर्णय बहुतांशी उत्पादकांनी घेतला आह.े काही दिवसांपुर्वी समतोलीत वातावरण असल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. व उत्साह वाढला होता मात्र सध्यिस्थतीतील बदलत्या वातावरणामुळे त्या उत्साहावर पाणी फिरले असुन हा उत्साह औटघटकेचा ठरतो की काय? अशी भिती उत्पादकांच्या मनात उभी ठाकली आहे.कारण सध्या स्थानिक म्हणजेच देशांतर्गत ठिकाणी विक्र ी करण्यासाठीची द्राक्षे दिंडोरी तालूक्यातील काही भागात असली तरी अपेक्षति व समाधानकारक भाव नाही निर्यातक्षम द्राक्षे क्लीष्ट व गुंतागुंतीची प्रक्रि या पार पाडत उत्पादकांनी उत्पादित केली. कृषी घटकाचे नियम व निकष यांची पुर्तता करु न द्राक्षिवक्र ीसाठी तयारी केली. काही उत्पादकांचे व्यवहारही झाले. काही उत्पादकांचु खुडणीही सुरु आहे मात्र सध्यिस्थतीतील वातावरण व हवामान उत्पादकांच्या उत्साहावर विरजण घालणारे आहे. दिल्ली व लगतच्या राज्यांमधे सध्या थंडी वाढलेली आहे. दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्षे खरेदीसाठी या भागातील ग्राहकही पसंती देतात. तसेच चांगल्या प्रतीच्या स्थानिक उत्पादीत द्राक्षानाही मागणी असते मात्र प्रतिकुल वातावरणाचा फटका बसण्याची चिन्हे उभी ठाकली आहेत. युनायटेड किंगडम या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त परदेशोय भागात तसेच इतर परदेशीय भागात तालूक्यातील द्राक्षे विक्र ी साठी जात आहेत. मात्र कडक नियम व अटींची पुर्तता करण्यासाठी दमछाक होते आह.े कारण उपलब्ध नमुना व व्यवहार निश्चितीनंतर खुडणी केलेल्या द्राक्षामधे तफावत आढळली. तर माल पाठविल्यानंतर विशिष्ट दिवसानंतर खात्यात रक्कम जमा होण्याची तयारी उत्पादकांना ठेवावी लागते.हा सगळा द्राविडी प्राणायाम उत्पादकांना तापदायक असला तरी नाईलाजाने निर्णय प्रक्रि या पुर्ण करावी लागते अशी अवस्था आहे. दरम्यान सध्या घसरलेल्या तपमानाची समस्या उत्पादकांच्या पुढे आहे अशा वातावरणात द्राक्ष मागणीवर परिणामा होतो. संक्र ातीनंतर थंडी हळुहळु कमी होत जाते मात्र याउलट चित्र निर्माण झाल्याने उत्पादक हवालदील झाले आहेत. मागील वर्षी मार्च महीन्यापर्यंत थंडीने पिच्छा सोडला नव्हता त्यावेळीही उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते .त्याची पुनरावृत्ती होउ नये अशी अपेक्षा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.(16ग्रेप्स)
प्रचंड थंडीमुळे उत्पादक धास्तवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:26 IST
वणी : गेल्या दोन दिवसांपासुन वातावरणात कमालीचा बदल झाला असुन तपमान घसरल्याने द्राक्षउत्पादकांची चिलबचल वाढली आहे. वणी व परिसरात ...
प्रचंड थंडीमुळे उत्पादक धास्तवले
ठळक मुद्दे तपमान घसरले:ठरलेल्या दरात व्यवहार फिस्कटण्याची शक्यता