शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पर्युषण पर्व समाप्तीनिमित्त मिरवणूक

By admin | Updated: September 8, 2016 01:28 IST

नाशिकरोड : जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे धार्मिक कार्यक्रम

नाशिकरोड : नाशिकरोड जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे पर्युषण पर्व समाप्तीनिमित्त श्री महावीर स्वामी प्रतिमा व अठ्ठाई तप करणाऱ्या दीक्षिता विनय कर्नावट हीची परिसरातून वरघोडा मिरवणूक काढण्यात आली होती. आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनीसुव्रत स्वामी जैन मंदिरात पर्युषण पर्वानिमित्त गेले आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पर्युषण पर्व समाप्तीनिमित्त बुधवारी सकाळी एका सजविलेल्या रथातून श्री महावीर स्वामींची प्रतिमा व अठ्ठाई तप आठ दिवस उपवास करणाऱ्या दीक्षिता विनय कर्नावट हीची वरघोडा मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी फळाचे अनुकंपा दान करण्यात आले. तसेच जैन मंदिरात वीर स्थानक पूजन, देवाची भक्ती भजन आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर जैन भवनमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे संघपती कन्हैयालाल कर्नावट, जैन श्रावक संघाचे संघपती सुभाष घिया, गिरीश शहा, पृथ्वीराज बोरा, विजय संकलेचा, संदीप कर्नावट, प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे, नगरसेवक रमेश धोंगडे, दत्ता गायकवाड, सुधाकर जाधव, हेमंत गायकवाड, श्याम खोले, अनिल ढेरिंगे, संतोष मंडलेचा, राजू साबद्रा, राजू बोथरा, मनोज चोपडा, परेश ठक्कर, विनय कर्नावट, अतिष वाघ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)