सिडको : जुने सिडको येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त चांदीच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.सिद्धिविनायक गणपती मंदिरात दरवर्षीप्रमाणे अंगारकी चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त परिसरातून चांदीच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरय्या... मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात परिसर दुमदुमला होता. भजनी मंडळ, कलशधारी सुवासिनी आणि बालगोपाळांनी यात सहभाग घेतला होता.महंत ग्यानदास, महंत संजयदास, महंत शक्तिचरण यांच्या हस्ते पूजन करून आरती करण्यात आली. याप्रसंगी स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, आमदार सीमा हिरे, नगरसेवक राजेंद्र महाले, शोभा बच्छाव, मामा ठाकरे, सीमा बडदे, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, एस. टी. अवसरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे जयंत सोनार, किशोर त्र्यंबके, प्रकाश दिवाणे, संतोष तांबोळी, रोशन खैरनार यांनी केले.
सिडकोतील मंदिरात पादुकांची मिरवणूक
By admin | Updated: September 3, 2015 23:46 IST