शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात नवसाला पावणाऱ्या दाजिबा विरांची पारंपरिक मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 18:40 IST

दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या आणि नवसाला पावणा:या दाजीबा (बांशिग) वीर मिरवणूक शुक्रवारी (दि.2) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजीबा वीराचे भक्तीपूर्ण वातावरणात दर्शन घेतले.

ठळक मुद्देनाशकता दाजिबा विरांची मिरवणूक मिरवणुकीला दीडशे वर्षांहून अधिकची वर्षांची परंपरा

नाशिक : दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या आणि नवसाला पावणा:या दाजीबा (बांशिग) वीर मिरवणूक शुक्रवारी (दि.2) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजीबा वीराचे भक्तीपूर्ण वातावरणात दर्शन घेतले.दाजीबा वीर मिरवणूक शुक्रवारी धुळवडच्या दिवशी बुधवार पेठेतून पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. तत्पूर्वी, होळी पौर्णिमेच्या रात्री तळेगाव जानोरी (ता. दिंडोरी) येथे दाजीबा वीराची पारंपरिक पूजा क रून वीर नाशिकमध्ये आणण्यात आले.

दुपारी दोनच्या सुमारास जुने नाशिक येथील बुधवार पेठेतून दाजीबा वीराची मिरवणूक काढण्यात आली. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरवणुकीची सुरवात यंदाही बुधवार पेठेतून झाली. मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा-रांगोळी काढल्याने परिसरात प्रसन्न वातावरण होते.

ही मिरवणूक काजीपुरा, डिंगरअळी, टाकसाळ गल्ली, भद्रकाली, तेली गल्ली, रविवार कारंजा, रामकुंड येथे पूजा करून पुन्हा दाजीबा वीर मिरवणुकीचा बुधवार पेठेत समारोप झाला.

वीरांनी वेधले लक्षदाजीबा वीराची आस्था सर्व भाविकांत मोठया प्रमाणात असल्याने भाविक मिरवणूक मार्गात दाजीबा वीर बघण्यासाठी गर्दी करत असतात. रामकुंड परिसरात दाजीबा वीर मिरवणूक येत असल्याने शहरातील विविध भागांतील भाविक याठिकाणी येत वीरासह अन्य वीराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दिसून आले. दाजीबा वीर मिरवणुकीसाठी दर वर्षी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे पोलिसांतर्फे ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त चोख लावण्यात आला होता.

वीर नाचवण्याची अनोखी परंपराराज्यभरात धुळवडीचा उत्सवानिमित्त ठिकठिकाणी रंगांची उधळणही होते. पंरंतु, नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी विरांना नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. वेगवेगळ्या देव देवतांचे मुखवटे धारण करून हे विर नाशिकच्या गोदावरीत आपल्या घरातल्या देवांना स्नान घालतात आणि परततात. या विरांमध्ये महत्वाच्या असलेल्या दाजिबा विर मिरवणूक दुपारनंतर निघते. सुमारे दिडशे वर्षापासून गवळी घराण्याकडे या परंपरेचा मान आहे. शहरातून निघणारा हा दाजिबा वीर नवसाला पावणारा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच या नवसाला पावणा:या दाजिबा विराच्या दर्शनासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक