पोळ्यानिमित्त येवल्यात मिरवणूक जिल्ह्यात उत्साह : दुष्काळाचे सावट; घरोघरी बैलांची पूजा येवला : दुष्काळाची पार्श्वभूमी असली तरी येवला शहरात शनिवारी सायंकाळी ७ वाजता बैल पोळ्याची मिरवणूक बैलांची संख्या कमी असली तरी ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. येथील गंगादरवाजा भागात सर्व शेतकरी त्यांच्या सजवलेल्या बैलासह जमा झाले. अग्रभागी राजे रघुजीराजे शिंदे यांचे वंशज अॅड. माणिकराव शिंदे यांचा डोक्यावर बाशिंग धारण केलेला मानाचा बैल होता. मानाच्या बैलाचा कासरा,भास्करराव शिंदे , शाहू शिंदे ,अरविंद शिंदे ,यांच्या हातात होता. मुकुंदराव पोफळे, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे,अशा ४० शेतकऱ्यांचे बैल या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दुष्काळी पाशर््वभूमीमुळे डोक्यावर मानाचे बाशिंग असले तरी यंदा शिंदे यांचा मनाच्या बैल आपल्या मूळ रूपातच मिरवणुकीत सहभागी झाला. अंगावर कोणताही रंग अथवा झूल पांघरली नाही. नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी यंदा कोणताही ढोल ताशांचा गजर न करता आपले बैल साध्या वाद्यावर मिरवणे पसंत केले. वाद्यासह खर्चात बचत करून ११ हजार रूपयाचा चारा दुष्काळी भागात जनावरांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रताप परदेशी यांनी आपले सफेद घोडे मिरवणुकीत आणले होते. रात्री ९ वाजता मिरवणूक आटोपली. मानाच्या बैलाने प्रथम येथील मोठे महादेव मंदिराच्या पायरीवर माथा टेकवला. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी सुमारे २०० बैलानी महादेवाचे दर्शन घेतले. राजे रघुजी शिंदे यांच्या मंदिरात दर्शन घेवून मिरवणूक संपली. मनमाड : मनमाड सह परिसरातील ग्रामीण भागात पोळा सण साजरा करण्यात आला.या वर्षी समाधानकारक पाउस न झाल्याने पोळा सणावर दुष्काळाचे सावट होते.दुपार नंतर सजवलेले बैल गावाच्या वेशीजवळ आनण्यात आले. पोळा फोडण्याचा मान आपल्या बैलांना मिळावा या साठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता. सुरेश सोळसे यांनी तुतारी वाजवल्यानंतर पोळा फोडण्यात आला. गावातील मारूती मंदिरा समोर बैलांची हजेरी लाउन गावातुन वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.घराघरासमोर बैलांचे पुजन करुन पुरणपोळी खाउ घालण्यात आली.अनेक घरांमधे देवघरासमोर मातीच्या बैलांची पुजा करण्यात आली.साध्या पध्दतीने साजरा
खामखेडा: देवळा तालुक्यातील खामखेडा येथे पोळा सण दुष्काळ सावट आसल्याने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बैलांच्या अंगावर रंग रंगगोटी करून मारु तीचे दर्शन घेण्यात आले. घरोघरी बैलाची पूजा करु न त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला.जोरण : येथे परंपरेनुसार गावांमध्ये बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पोळ्यानिमित्त बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी बैलांचे पूजन करण्यात आले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त कसबे सुकेणे : कसबे सुकेणे येथे पोळा वेस असल्याने याठिकाणी पोळयाचा मोठा उत्साह असतो. यंदा मात्र दरवर्षी प्रमाणे उत्साह दिसत नसला तरी मात्र गावच्या प्रथेप्रमाणे वेसीतुन पहिल्या बैलजोडया सोडण्याचा मान परंपरेप्रमाणे यंदा सदाशिव शेवकर्यांना देण्यात आला. यावेळी शेतकर्यांनी बैलांना सजवुन पोळयात सहभागी करून मिरवणुक काढली. याप्रसंगी कसबे सुकेणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.