नशिक : महाराष्ट्र नाभिक महामंडळ महानगर शाखा आणि महानगर सलून असोसिएशन यांच्या वतीने जिवा महाला यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातून मिरवणूक काढण्यात आली. अरुण सैंदाणे, विजय पंडित यांनी शहरात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. रविवार कारंजा ते पंचवटी कारंजा दरम्यान जिवा महाला यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, नाशिकरोड येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि जिवा महाला यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार योगेश घोलप, राहुल तुपे उपस्थित होते. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीत प्रदीप जाधव, अंबादास बोरसे, सुदाम ठाकरे, चेतन सूर्यवंशी, बाळासाहेब कडवे, संदीप डाके आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
जिवा महाला जयंतीनिमित्त मिरवणूक
By admin | Updated: October 12, 2015 22:29 IST