शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महर्षी वाल्मीक यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:13 IST

भगवान महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त परिसरात ठिकठिकाणी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त सायंकाळी काढण्यात आलेली मिरवणूक उत्साहात पार पडली.

नाशिकरोड : भगवान महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त परिसरात ठिकठिकाणी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त सायंकाळी काढण्यात आलेली मिरवणूक उत्साहात पार पडली.  भगवान महर्षी वाल्मीक यांच्या जयंतीनिमित्त देवळालीगाव, सत्कार पॉइंट, अनुराधा, दुर्गा उद्यान, भाजीबाजार, बिटको, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, जेलरोड, जयभवानीरोड, गोरेवाडी आदी ठिकाणी आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले होते. बुधवारी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मीक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  जयभवानीरोड येथे भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेच्या वतीने भगवान महर्षी वाल्मीक यांच्या प्रतिमेचे जिल्हा प्रभारी राजपाल चटोले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सुनील राठोड, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विशाल बागडी, सचिव नीलेश कसे, नाशिक शहर अध्यक्ष सतीश अलई, उपाध्यक्ष प्रकाश थामेत कार्याध्यक्ष सागर महेरोलिया, नाशिकरोड शहर अध्यक्ष गुड्डू मेहेरोलिया आदी उपस्थित होते.  रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन व महापालिका सफाई कामगारांच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयाजवळ प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेविका ज्योती खोले, सरोज आहिरे, माजी नगरसेवक सुनील वाघ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी रामबाबा पठारे, संतोष वाघ, बबलू ढकोलिया, संजय चिखले, नीलेश राठोड, जनार्दन घंटे, संजय चव्हाण, बंटी सोदे, राजा विव्हाल, प्रकाश वाघमारे, राजू निरभवणे, विजय मोरे आदी उपस्थित होते.दोन चित्ररथभगवान महर्षी वाल्मीक यांच्या जयंतीनिमित्त देवळालीगावातून दोन चित्ररथ व गोरेवाडी येथून एका चित्ररथाद्वारे मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक आंबेडकर पुतळा येथे विसर्जित करण्यात आली. मिरवणुकीमध्ये वाल्मीक समाज बांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक