शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

आला हजरत स्मृतिदिनानिमित्त ‘जुलूस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:02 IST

इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत इमाम अहमद रजा उर्फ आला हजरत यांच्या १०१व्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक परिसरातून मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. तसेच विविध मशिदींमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले.

नाशिक : इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत इमाम अहमद रजा उर्फ आला हजरत यांच्या १०१व्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक परिसरातून मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. तसेच विविध मशिदींमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले.इस्लामचे थोर अभ्यासक व धार्मिक साहित्यकार आला हजरत यांनी समाजाला दिशा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुराण व हदीसला अनुसरून दर्जेदार लिखाण केले आहेत. त्यांच्या लिखाणातून समाजाला आजही प्रेरणा मिळते. दरवर्षी आला हजरत यांचा स्मृतिदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही मागील दोन दिवसांपासून शहरातील विविध मशिदींमध्ये ‘उरूस-ए-आला हजरत’चा कार्यक्रम पार पडला.दरम्यान, शहर ए खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुने नाशिक परिसरातून सकाळी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव तसेच मदरसा सादिकुल उलूम, गौस-ए-आजमचे विद्यार्थी पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. सहभागी मंडळांकडून आला हजरत यांच्यावर अधारित विविध काव्यपंक्तीचे पठण केले जात होते. मिरवणुकीच्या अग्रभागी नुरी अकादमीचे हाजी सय्यद वसीम पिरजादा, रजा अकादमीचे एजाज रझा मकरानी, मौलाना मुफ्ती महेबूब आलम, मौलाना कारी रईस, मौलाना हाफीज जमाल, मौलाना अजहर, मौलाना वासिक रजा, मौलाना शमशोद्दीन मिस्बाही आदी धर्मगुरू उपस्थित होते. जमात-ए-रझा मुस्तुफा, दावत-ए-इस्लामी, सुन्नी दावत-ए-इस्लामी, शाह सादिक अकादमी या संघटनांचे प्रचारक तसेच इमाम अहमद रजा लर्निंग सेंटरचे पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाले होते.उच्च शिक्षण हाच प्रगतीचा मार्गआला हजरत यांनी उच्च शिक्षणाच्या जोरावर आपल्या ज्ञानाच्या अधारे समाजाला दिशा दाखविणाऱ्या साहित्याची निर्मिती केली. त्यामुळे समाजाने त्यांच्या साहित्यातून उच्चशिक्षणाचा मूलमंत्र लक्षात घेत भावी पिढीला सुसंस्कार द्यावे तसेच उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी हिसामुद्दीन खतीब, वसीम पिरजादा आदींनी बडी दर्गाच्या प्रांगणात मंचावरून समारोपप्रसंगी बोलताना केले.

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious programmeधार्मिक कार्यक्रम