शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जातीचे दाखले मिळण्याची प्रक्रिया शाळेतूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:21 IST

दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे जातीचे तसेच अन्य दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये तसेच महाआॅनलाइन केंद्रांवर विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करीत असल्याने सर्व्हर डाउन होऊन प्रत्यक्ष प्रवेशापर्यंत विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास अडचण निर्माण होते.

नाशिक : दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे जातीचे तसेच अन्य दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये तसेच महाआॅनलाइन केंद्रांवर विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करीत असल्याने सर्व्हर डाउन होऊन प्रत्यक्ष प्रवेशापर्यंत विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढला असून, येत्या १ आॅगस्टपासून जातीचे दाखले काढण्यासाठीची प्रक्रिया ही शाळेतूनच राबविली जाणार आहे. यामुळे केंद्रांवरील भार कमी होणार आहेच शिवाय प्रवेशासाठी येणारी अडचणही कमी होणार असल्याने सदर उपक्रम प्रभावीपणे अंमलात आणणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.दहावीच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी होणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशाच्या तारखेपर्यंतही दाखले मिळत नाही. सर्व्हर डाउन झाल्यामुळे, तर संपूर्ण यंत्रणाच ठप्प होऊन जाते. यंदाही हा प्रश्न प्रकर्षाने समोर आल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शाळांमधूनच विद्यार्थांना दाखले वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.जे विद्यार्थी इयत्ता नववी आणि दहावीत असतील त्यांच्या दाखल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जातीचे दाखले काढण्यासाठी लागणारे संपूर्ण कागदपत्रे विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयातीच करतील. विद्यार्थ्यांचे सर्व अर्ज कागदपत्रांसह प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाºयांच्या मार्फत सर्व अर्ज संबंधित प्रांत यांच्याकडे सुपुर्द केले जातील. जातीचे दाखले तयार झाल्यानंतर ते शाळेतूनच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. किती दाखले आणि कोणत्या विद्यार्थ्याचे दाखल वितरीत करण्यात आले याची माहिती प्रांत कार्यालयाकडे उपलब्ध राहणार आहे. जेणे करून शाळा पातळीवर विद्यार्थ्यांचा अडचण आसल्याच प्रांत कार्यालयाकडून याबाबतची माहिती शाळेला कळविणे सुलभ होणार आहे.जातीचे दाखले हे पालकांच्या मूळ जन्मगावातूनच वितरित केले जात असल्यामुळे अशी प्रकरणे आल्यास ती संबंधित प्रांतांकडे वर्ग केली जातील याबाबतची निश्चित आणि सुलभ कार्यपद्धती तयार केली जाणार आहे.मोठ्या प्रमाणात अर्ज दाखलदहावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी लागणाºया दाखल्यांसाठी शहरातील सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होते. हजारोंच्या संख्येने या केंद्रांच्या माध्यमातून दाखले देण्याची प्रक्रिया राबविली जाते. यंदादेखील मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले, मात्र सर्व्हर यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे असंख्य दाखले अडकून पडले होते. त्यामुळे अर्ज स्वीकृती आणि दाखले वितरणाची संपूर्ण यंत्रणाच ठप्प पडली होती. ही बाब लक्षात घेऊन संभाव्य अडचणी टाळण्याबरोबरच विद्यार्थ्यांची धावपळ कमी करण्यासाठी शाळा पातळीवरच दाखले वितरित करण्याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCaste certificateजात प्रमाणपत्र