शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

साहित्याला सतत चैतन्यमय ठेवण्याची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:29 IST

नाशिकमध्ये साहित्य संमेलन का व्हावे? शहराला मोठी वाङ््मयीन परंपरा लाभलेली आहे़ यापूर्वी स्वातंत्र्यपूर्ण काळात १९४२ मध्ये मराठी साहित्य संमेलन ...

नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे?शहराला मोठी वाङ््मयीन परंपरा लाभलेली आहे़ यापूर्वी स्वातंत्र्यपूर्ण काळात १९४२ मध्ये मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले़ त्यानंतर सुमारे ६३ वर्षांनंतर २००५ मध्ये जानेवारी महिन्यात शिक्षण कर्मयोगी स्व़ वसंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ७८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले़अशा दोन मोठ्या साहित्य संमेलनाचा अनुभव नाशिककरांना आहे़ यावर्षी सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) यांच्या पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले आहे़ त्यासाठी औरंगाबाद येथे जाऊन महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना निवेदन दिले आहे़ संमेलनाच्या मूळ उद्दिष्टांपासून दूर जाणा-या संमेलनाला मुळ उद्दिष्टांकडे आणणे हा मुख्य हेतू असावा़ तसेच संमेलन केवळ खर्च, व्यवस्था, निमंत्रणे, अनुदान, राजकारण यासाठी न गाजता साहित्यिक योगदानांसाठी गाजवीत मराठी भाषेच्या सन्मानासाठी प्रचार आणि प्रसारासाठी गाजावे हा हेतू असावा. कारण साहित्य संमेलन ही रसिकांसाठी पर्वणी असते़संमेलनातून सादर होणाºया निमंत्रितांच्या नवोदितांच्या कविता तसेच साहित्य, समाज, संस्कृती, राजकारण माध्यमे यांच्या स्थित्यंतरांबद्दल होणारे परिसंवाद, चर्चासत्रे साहित्यास सतत चैतन्यमय ठेवून विचार प्रवृत्त करतात़ त्याचप्रमाणे लेखकांच्या मुलाखती, अध्यक्षीय भाषणे, ग्रंथ प्रदर्शने यातून नवे लेखक-कवी घडावेत हा संमेलनाचा उद्देश असतो़ त्यामुळे या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे़सावानातील माझ्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना तसेच सावानाशी निगडीत अनेक शैक्षणिक साहित्य, वाद्य, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांचा पूर्वीच्या साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग होता़ आगामी काळात साहित्य संमेलन आल्यास तसाच सहभाग राहील़ नाशिक हे ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक शहर असून, येथे साहित्य, कला, शिक्षण आदी विधायक उपक्रम होतात़ तसेच विचारांचे आदान-प्रदान होते़ नाशिकमध्ये पुन्हा एकदा साहित्यिक वातावरण व्हावे, ग्रंथोत्सव, भाषा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात यावे, असे वाटते़- वेदश्री थिगळेसमाज व राज्यश्रयाची साथ घेऊन साहित्य संमेलन यशस्वी होते़ त्यातून साहित्याचा विकास होतो़ ग्रंथाची आरास दिसते, वैचारिक चर्चा घडते़ लेखक, वाचक, प्रकाशक, समीक्षक, संशोधक आणि अध्यक्षीय मनोगत यांच्या सन्मानासाठी साहित्य संमेलनासाठी साहित्य संमेलन व्हावे मुख्य म्हणजे साहित्य संमेलनाची स्मरणिका ही स्थित्यंतराचा दस्तऐवज आणि पुरावा असतो़ त्यामुळे वाचक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होणारी स्मरणिका जपून ठेवतात़

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक